‘मासिक पाळी’ दरम्यान, बाभूळ च्या सालापासून बनवलेला काढा ठरतो खुप फायदेशीर; जाणून घ्या, कसा बनवायचा हा गुणकारी काढा !

मासिक पाळीदरम्यान येणाऱया आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी बाभूळ अत्यंत गुणकारी ठरते. बाभूळच्या सालापासून तयार केलेल्या काढ्याचे सेवन केल्यास, महिन्यातील त्या दिवसही आरामदायी ठरू शकतात.

‘मासिक पाळी’ दरम्यान, बाभूळ च्या सालापासून बनवलेला काढा ठरतो खुप फायदेशीर; जाणून घ्या, कसा बनवायचा हा गुणकारी काढा !
periodsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 7:21 PM

मुंबईः मासिक पाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना (Physical problems) सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत महिला आजकाल वेदना कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात. असाच एक उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जो आजकाल खुप उपयुक्त ठरत आहे, ती म्हणजे बाभूळ. बाभूळच्या झाडाबद्दल (About the acacia tree) आपण सर्वांनी ऐकले आहे. झाडाचे लाकूड फर्निचर इत्यादींसाठी वापरले जाते. पण तुम्ही कधी बाभळीच्या झाडाचे साल सेवन केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की बाभळीच्या सालामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कार्बोहायड्रेट्स सारखे घटक आढळतात, त्यामुळे ही साल उकळून त्याचा काढा पिल्याने, अनेक आजारांपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊया बाभळीचा काढा कसा तयार करायचा. आणि मासिक पाळीदरम्यान, हा काढा किती गुणकारी (Curative) आहे.

बाभळीच्या सालाचा रस पिण्याचे फायदे

1. पीरियड्सच्या दुखण्यापासून आराम मिळवणे – बाभळीच्या काढ्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. याने पीरियड्सची समस्या दूर होऊ शकते, मासिक पाळीच्या वेळी पोटात खूप दुखत असेल किंवा पेटके येत असतील, तर, मग या काढ्याचे सेवन करा, तुम्हाला खूप फायदे होतील.

2. तोंडाच्या फोडांवर उपचार

अनेक वेळा मासीकपाळी दरम्यान, पोटाच्या समस्येमुळे तोंडात फोड येतात, अशा परिस्थितीत बाभळीचा रस प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे अल्सरलाही लवकर आराम मिळतो. याशिवाय बाभळीच्या सालाने दात स्वच्छ होतात.

3. केस गळणे थांबवण्यासाठी

बाभळीचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते. असे सांगण्यात येते मेंदूतील रक्तप्रवाह सुधारणे, केस गळणे थांबवणे आणि वाढ वाढवणे यासाठीही हे फायदेशीर आहे.

4. पाठदुखीपासून आराम

बाभळीचा रस प्यायल्याने पाठदुखी, पाय दुखण्यात खूप आराम मिळतो. बाभूळमध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, अशा स्थितीत त्याचा काढा प्यायल्याने दुखण्यात आराम मिळतो.

6. दातांच्या समस्येपासून सुटका

बाभूळ दातांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे साल दात दातांसाठी खूप चांगले मानले जातात. अशा परिस्थितीत दात निरोगी ठेवण्यासाठी काढा प्या. काढा एक चम्मचही प्यायल्याने दात मजबूत होतात.

7. वजन नियंत्रित होते

असे मानले जाते की बाभळीचा रस नियमित प्यायल्याने शरीराचे वाढते वजनही नियंत्रित राहते. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे वजन वाढण्यास प्रतिबंध करतात.

बाभळीच्या सालाचा काढा कसा तयार करायचा

बाभळीच्या सालाचा काढा तयार करण्यासाठी आपण प्रथम 1 ग्लास पाणी घेऊ, नंतर हे पाणी गॅसवर उकळून घ्या, नंतर त्यात 1 चमचे बाभळीच्या सालाची पूड घाला, आता त्यात पाणी घाला, सुमारे 10 मिनीटे उकळवा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. यानंतर या पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळा. आता तुमचा काढा तयार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.