Health Tips: पावसाळ्यात कानाच्या इन्फेक्शनचा वाढतो धोका , जाणून घ्या लक्षणे व त्यापासून वाचण्याचे उपाय

पावसाळ्यात आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या काळात रोगप्रतिकारक शक्तीही कमी झालेली असल्याने आपण सहज आजारी पडू शकतो. त्यापासून वाचण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

Health Tips: पावसाळ्यात कानाच्या इन्फेक्शनचा वाढतो धोका , जाणून घ्या लक्षणे व त्यापासून वाचण्याचे उपाय
EAR INFECTIONImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 1:36 PM

Ear Infection in Monsoon Reason: पावसाळ्यात (Monsoon season) अनेक आजारांचा धोका वाढतो. या काळात रोगप्रतिकारक शक्तीही (Immunity) कमी झालेली असल्याने अनेक रोगांचे जंतू आपल्या शरीरात सहज प्रवेश करून आपल्याला आजारी पाडू शकतात. सर्दी, खोकला, ताप हे आजार तर पावसाळ्यात सामान्यपणे होतच राहतात. पावसाच्या दिवसात योग्य काळजी न घेतल्यास फंगल इन्फेक्शनचा त्रास अनेक लोकांना होत दिसतो. त्याचा संसर्ग त्वचा, डोळो, कान , नाक यांना होऊन अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्यात बऱ्याच व्यक्तींना कानातील इन्फेक्शनचा (Ear Infection) त्रास होतो. पावसाच्या पाण्यामुळे तसेच हवेतील आर्द्रतेमुळे कान दुखणे, सुन्न होणे, सतत खाज सुटणे किंवा कानासंबंधी अन्य त्रास होऊ शकतात. तुम्हालाही कानासंबंधी ही लक्षणे जाणवत असतील, तुमच्या कानालाही इन्फेक्शन झाल्याची शक्यता आहे. अशावेळी त्वरित डॉक्टरांना दाखवून उपाय करावेत.

जाणून घ्या कानाच्या इन्फेक्शनची कारणे

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांत डोळे, कान, नाक आणि त्वचेसंबंधी समस्यांमध्ये वाढ दिसून येते. याचे मुख्य कारण असते, हवेतील आर्द्रता, जी फंगल इन्फेक्शन उत्पन्न करणाऱ्या जंतूचे प्रजनन स्थळ असू शकते. कानातील धूळ, घाण आणि इअरबड्सच्या खुणा, हेही इन्फ्केशनसाठी कारणीभूत ठरू शकतात.

कानातील इन्फेक्शनची लक्षणे :

  • कान सतत दुखणे.
  • कानात खाज सुटणे.
  • कानाचा बाह्यभाग लाल होणे.
  • नीट ऐकू न येणे
  • कान जड झाल्यासारखे वाटणे
  • कानातून पांढऱ्या वा पिवळ्या पू निघणे.

हे आहेत कानाच्या इन्फेक्शनपासून वाचण्याचे उपाय :

  1. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असते. कानात ओलावा राहू नये याची काळजी घ्यावी. कान नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
  2. कान पुसण्यासाठी मऊ, कॉटनचे कापड वापरावे. कान जोरात, चोळून पुसू नये. हळूवार हाताने टिपून घ्यावा.
  3. सतत इअरफोन्स वापरू नये.
  4. कान साफ करण्यासाठी सतत इअरबड्सचा वापर करू नये.
  5. दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले इअरफोन्सचा वापर करू नये.
  6. इअरफोन्स वेळोवेळी साफ करून, निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
  7. गळ्यात खवखव किंवा इन्फेक्शन झाल्यास त्यामुळेही कान दुखणे वा इन्फेक्शनचा इतर त्रास होऊ शकतो. त्यामुळे गळ्याचीही निगा राखावी.
  8. दर 6 महिन्यांनी कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.