सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी खोकल्याचा त्रास, कशी सांभाळणार तब्येत?

पाऊस कितीही आवडला तरी तो आपल्यासोबत अनेक समस्याही घेऊन येतो. त्यामुळे या बदलत्या ऋतूत आपण सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा संसर्गाचा धोका असतो आणि मग सर्दी, खोकला होतो.

सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी खोकल्याचा त्रास, कशी सांभाळणार तब्येत?
Cough and cold due to change in environmentImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 1:31 PM

वेळी अवेळी पाऊस पडल्यास या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सतत बदलणारं हवामान हे आरोग्यासाठी कधीही हानिकारक. कधी पाऊस, कधी ऊन, जो ऋतू असेल त्या ऋतूत मध्येच काहीतरी वेगळं हवामान होतं आणि मग तब्येत बिघडते. पाऊस कितीही आवडला तरी तो आपल्यासोबत अनेक समस्याही घेऊन येतो. त्यामुळे या बदलत्या ऋतूत आपण सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा संसर्गाचा धोका असतो आणि मग सर्दी, खोकला होतो. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते घरगुती उपाय आहेत जे या समस्येपासून बचाव करतात.

सर्दी-खोकला टाळण्यासाठी या गोष्टी खा

नारळाचे तेल

नारळाचे तेल सामान्यत: केस आणि चेहऱ्यासाठी वापरले जाते परंतु दक्षिण भारतातील रहिवाशांप्रमाणे, आपण ते स्वयंपाकाचे तेल म्हणून देखील वापरू शकता. यात हेल्दी फॅट असते जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. सकाळी या तेलाच्या साहाय्याने जेवण बनवले तर सर्दी- खोकल्याचा धोका कमी होईल.

कोमट पाणी

पावसाळ्यात इन्फेक्शन आणि आजार होण्याचा धोका लक्षणीय वाढतो, त्यामुळे थंड किंवा नॉर्मल पाण्याऐवजी कोमट पाणी प्या, यामुळे इन्फेक्शनपासून तुमचा बचाव तर होतोच, शिवाय पचनक्रियाही सुधारू शकते.

आले

आलं एक मसाला आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात नक्कीच आढळतो. जेवणाची चव वाढविण्यासाठी आल्याचा वापर केला जातो. अनेक जण चहात आलं टाकल्याशिवाय चहा पित नाहीत. सर्दी दूर करण्यासाठी तुम्ही आले कच्चे चावून खाऊ शकता. आपण ते बारीक करून त्याचा रस पिऊ शकता. काही लोक आले आणि आवळा एकत्र करून त्याचं सेवन करतात, ज्यामुळे खूप फायदा होतो.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.