लिंबाचं अतिसेवन तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक! काय आहे कारण आणि होणारे दुष्परिणाम?

शरीरात एखाद्या पदार्थाचा अतिरेक केल्यास याचा विपरीत परिणाम शरीरावर जाणवू शकतो. लिंबूच्या अतिरिक्त सेवनामुळे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम जाणवू शकतात. लिंबूत मुबलक प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. परंतु हे जीवनसत्व शरीरात किती प्रमाणात घ्यावे यालाही मर्यादा आहेत.

लिंबाचं अतिसेवन तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक! काय आहे कारण आणि होणारे दुष्परिणाम?
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:01 AM

मुंबईःआपले शरीर एका वेळी ठरावीक प्रमाणापेक्षा जास्त ‘व्हिटॅमिन सी’ (vitamin c) साठवू शकत नाही. त्यामुळे केवळ लिंबूच नाही तर ‘व्हिटॅमिन सी’चे गुणधर्म असलेले इतरही पदार्थ क्षमतेपेक्षा जास्त सेवन केल्यास याचे शरीरावर अपाय दिसून येत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास आरोग्याला हानी पोहोचते. लिंबू (lemon) शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतो. यामध्ये आढळणारे ‘व्हिटॅमिन सी’ आपली रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्याचे काम करते. कोरोना काळात आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबूवर्गीय पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत होता. यात ‘व्हिटॅमिन सी’ असल्याने यातून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असते. त्यामुळे अनेकांनी लिंबू, संत्री, आवळा आदींचा आपल्या आहारात समावेश केला होता. परंतु आरोग्यासाठी वरदान ठरत असलेल्या या घटकांचे अतिसेवन केल्याने तेच आपल्यावर दुष्परिणाम करू शकतात.

मायग्रेनचा होतो त्रास

लिंबाच्या अतिसेवनामुळे मायग्रेनचा त्रास संभवतो. आंबट पदार्थांमध्ये ‘टायरामाइन’ असल्याने, त्याचा अतिरेक मेंदूच्या मज्जासंस्थेत तणाव निर्माण करतो. त्यामुळे रोज फक्त दोन ते तीन लिंबांचे सेवन करावे, अतिरेकाने शरीराला त्रास होऊ शकतो.

ॲसिडीटीचा धोका

लिंबूमध्ये आढळणारे ‘व्हिटॅमिन सी’ हे आरोग्यासाठी लाभदायक असले तरी, आपले शरीर एका वेळी विशिष्ट प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ साठवून ठेवू शकते, त्याबाहेर हे प्रमाण गेल्यास ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच, केवळ लिंबूच नाही, तर ‘व्हिटॅमिन सी’ जास्त असलेली कोणतीही गोष्ट जास्त खाल्ल्यास अॅसिडिटीचा धोका असतो.

पोटदुखी

जास्त प्रमाणात लिंबू खाल्ल्यानेही पोट खराब होऊ शकते. ‘आम्ल रिफ्लक्स’मुळे पोटाचा त्रास निर्माण होऊ शकतो. लिंबूचे सेवन करताना ते प्रमाणात करावे, अतिसेवन केल्याने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दातांची समस्या

अत्यंत आंबट तसेच लिंबूचे अतिसेवन दातांसाठी हानिकारक आहे. आपले दात लिंबूमध्ये असणाऱ्या अम्लीय घटकांबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. ज्यांना आधीच दातांसंबंधी कोणतीही समस्या आहे, त्यांनी लिंबू किंवा आम्लधर्मीय पदार्थांचे अतिसेवन टाळावे.

त्वचेची ॲलर्जी

लिंबू किंवा ‘व्हिटॅमिन सी’च्या अतिरेकामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. लिंबूमध्ये ॲसिडीक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असल्याने यातून त्वचेवर लाल चट्टे, खाज सुटणे आदी दुष्परिणाम निर्माण होत असतात.

संबंधित बातम्या

बहुगुणी हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?

PCOS Cure : डॉक्टरांचा सल्ला ते डाएटिंग, PCOS पासून आयुष्यभराची मुक्ती; वाचा डॉक्टरांच्या टिप्स

घसा खवखवण्याच्या समस्यांपासून या घरगुती उपायांनी आराम मिळवा

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.