National Pollution Control Day 2022: विषारी हवेशी लढा देण्यासाठी उपयुक्त ठरतात हे 9 पदार्थ
काही पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि प्रदूषणाचा (शरीरावर होणारा) प्रभाव कमी करण्यास मदत मिळते.
नवी दिल्ली – दरवर्षी 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन (National Pollution Control Day) साजरा केला जातो. 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या लोकांचे स्मरण या दिवशी केले जाते. वायू प्रदूषणामुळे आरोग्याचे जे नुकसान अथवा हानी होते, त्याबाबत या दिवशी जनजागृती केली जाते. जगभरात 10 पैकी 9 लोकांना खराब हवेमध्ये श्वास (bad air quality) घ्यावा लागतो. ज्यामुळे त्यांना श्वसनाशी संबंधित आजार, फुफ्फुसांचा कॅन्सर, मेंदू किंवा किडनीचे नुकसान आणि हृदयरोग (side effects of air pollution) असे त्रास सहन करावे लागतात.
थंडीच्या दिवसांत उत्तर भारतात हवेची गुणवत्ता अतिशय खराब होऊ लागते. गंभीर प्रदूषणामुळे सकाळ-संध्याकळ घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मात्र असे असले तरी काही पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि प्रदूषणाचा (शरीरावर होणारा) प्रभाव कमी होतो. व्हिटॅमिन्स, ओमेगा फॅटी ॲसिड, कोथिंबीर, तुळस, हळद, दालचिनी इत्यादी पदार्थांचा त्यात समावेश आहे. मात्र शरीरास घातक ठरू शकेल अशा साखरेसारख्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.
वायू प्रदूषणापासून बचावासाठी काय खावे ?
– सफरचंद : यामध्ये मध्ये फॅलोनिक ॲसिड आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, त्यामुळे, प्रदूषणामुळे वायु मार्गामध्ये होणारी जळजळ कमी होते. त्यामध्ये काही असे घटक असतात, जे वायुमार्गाचा दाह कमी करतात आणि खोकला नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.
– ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात असतात, जे प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या अनेक प्रकारच्या ॲलर्जीशी लढतात आणि वायुमार्ग स्वच्छ करतात. मात्र, ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन करू नये जास्त ग्रीन टी पिऊ नका. त्याऐवजी भरपूर पाणी प्यावे, पाणी हे शरीरातील टॉक्सिन्स (विषारी पदार्थ) काढून टाकते.
– टोमॅटो हे व्हिटॅमिन्स आणि खनिज यांचा उत्तम स्रोत आहे. टोमॅटो खाल्ल्यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या दूर राखण्यास मदत होते.
– कोथिंबीर, बीन्स, ओव्याची पाने हे पदार्थदेखील आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे कार्य करतात.
– पुदीना हा आपल्या फुफ्फुसांना उत्तेजन देण्यास मदत करतो आणि श्वसनमार्गाला शांत करतो. तुम्ही पुदिन्याचा चहाही पिऊ शकता.
– आलं हे आपल्या श्वसनमार्गातून प्रदूषक तत्वं काढून टाकण्यास आणि फुफ्फुसांची जळजळ कमी करण्यास मदत करते.
– हळदीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करतात.
– तुळशीमुळे घशातील खवखव दूर करण्यात प्रभावी ठरते. तुम्ही तुळशीचा चहा पिऊ शकता किंवा एखाद्या सूपमध्ये तुळशीची पानेही घालू शकता. त्याशिवाय तुळशीची कच्ची पानं चघळणंही हे आपल्यासाठी फायदेशीर ठरतं.
– एवढेच नव्हे तर तुळशीची पाने, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मध, हळद मिसळून एक काढाही तयार करता येत. मात्र असा काडा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.