शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर करा ‘या’ ड्रायफ्रुट्सचे सेवन
हिमोग्लोबिन हे रक्तपेशींमध्ये असलेले लोह-आधारित प्रोटीन आहे, जे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास ती भरून काढण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे सेवन करता येते.
नवी दिल्ली: आपल्या रक्तात हिमोग्लोबिनची (hemoglobin) कमतरता (deficiency) आढळली तर शरीरात अशक्तपणा (weakness) जाणवू लागतो. हिमोग्लोबिन हे रक्तपेशींमध्ये असलेले लोह-आधारित प्रोटीन आहे, जे शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते. हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे (eat dryfruits) सेवन करता येते. कोणकोणते ड्रायफ्रुट्स खाल्याने फायदा होतो, हे जाणून घेऊया.
असे म्हटले जाते की मेंदू तल्लख करण्यासाठी आपण रोज बदामाचे सेवन केले पाहिजे. शरीरात हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल.
काजूचा वापर अनेक पाककृतींमध्ये आणि मिठाई, गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. काजूचे सेवन केल्याने आयर्न (लोह)ची कमतरता दूर होऊन हिमोग्लोबिन वाढते.
पिस्ता हाही हिमोग्लोबिन वाढवण्यास अतिशय उपयुक्त ठरतो. पिस्त्याची चव अनेक लोकांना आकर्षित करते. तुम्ही जर दैनंदिन आहारात नियमितपणे पिस्ताचे सेवन केल्यास शरीरातील आयर्न (लोह) वाढेल आणि हिमोग्लोबिन कमी असण्याची समस्या दूर होईल.
अक्रोड हे पोषक तत्वांचे भांडार आहे, त्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वं असतात. 5 ते 6 अक्रोडमुळे शरीराला अंदाजे 0.82 मिलिग्रॅम लोह मिळते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास तुम्ही दररोज अक्रोडचे सेवन केले पाहिजे.