डी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडं होऊ शकतात कमकुवत, या पदार्थांनी होईल कमतरता दूर

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

डी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडं होऊ शकतात कमकुवत, या पदार्थांनी होईल कमतरता दूर
Follow us
| Updated on: Oct 12, 2022 | 1:49 PM

शरीरात प्रत्येक पोषक तत्वाचे एक वेगळे महत्व असते. शरीरामध्ये कोणत्याही एका पोषक तत्वाची (nutrition)कमतरता निर्माण झाली तरी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन डी (vitamin D) हे असेच एक महत्वपूर्ण पोषक तत्वं असून शरीर स्वस्थ ठेवण्यात त्याचे मोठे योगदान असते. मासे, पनीर, अंडी, लिव्हर ऑईल हे व्हिटॅमिन डी चे चांगले स्त्रोत आहेत. मात्र सूर्य हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत आहे. हो ! जर तुम्ही दररोज काही वेळ उन्हात (sunlight)बसलात तर तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळते. ते हाडं मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडं आणि दातांवर सर्वात जास्त परिणाम होतो, ज्यामुळे रिकेट्स, ऑस्टियोमॅलेसिया आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारखे आजार होऊ शकतात. कोणकोणत्या पदार्थांद्वारे व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते, ते जाणून घेऊया,

संत्र्यांचा रस – वेब एमडी नुसार, संत्र या फळामध्ये व्हिटॅमिन डी हे भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशिअम हेही चांगल्या प्रमाणात असते. एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्यास आपल्याला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळू शकते. तुम्ही तुमच्या डाएटमध्येही त्याचा समावेश करू शकता.

हे सुद्धा वाचा

सॅल्मन मासे – सॅल्मन माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही सॅल्मन माशांचे सेवन केले तर तुमची पोषक तत्वांची गरज सहज पूर्ण होईल. त्यासोबतच तुम्ही मॅकेरेल, हेरिंग आणि सार्डिन माशांचेही सेवन करू शकता, त्यामध्येही व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात असते.

मशरूम – मशरूम हेही व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानले जाते. शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन डी मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी मशरूमचे सेवन उपयुक्त ठरू शकते.

दही – दूध आणि दही हे व्हिटॅमिन डीचे नैसर्गिक स्त्रोत आहेत, तसेच त्यामध्ये प्रथिनांसारखी पोषक द्रव्येही मुबलक प्रमाणात असतात. रोज एक वाटी दही खाल्यास हाडांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी असते.

अंडी – अंडी हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत मानला जातो, जो प्रत्येक व्यक्तीच्या बजेटमध्ये देखील बसतो. अंड्यांमध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन-डी, कॅल्शिअम आणि इतर अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही दररोज एका अंड्याचे सेवन करू शकता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.