केळी आणि सफरचंद एकत्र खाणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

केळी आणि सफरचंद एकत्रित खाल्ल्यामुळे अनेक पौष्टिक फायदे मिळू शकतात. दोन्ही फळांमध्ये अत्यावश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर समृद्ध असतात. त्यामुळे या दोन्ही फळांचे एकत्रित सेवन करणे योग्य आहे.

केळी आणि सफरचंद एकत्र खाणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 4:23 PM

आपल्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्याला फळे खाणे आवडत नाही. अनेकदा आपण आपल्या आहारानंतर किंवा दिवसभरात इतर वेळी फळांचं सेवन करतो. जर आपण फळां बद्दल बोललो तर सफरचंद आणि केळी अशा फळांच्या श्रेणीत येतात आणि प्रत्येकाच्या घरात हे नेहमीच असतात.ताजी फळे खाणे हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण काही वेळा दोन फळे एकत्रित खाणे योग्य नसते.पण कोणती फळे एकत्र खाऊ नयेत हे आपल्याला माहिती नसते.अशा परिस्थितीत केळी आणि सफरचंद एकत्र किंवा एकाच वेळी खाणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. याबद्दल जाणून घेऊयात तज्ञांकडून.

सफरचंद आणि केळी एकत्र खावे की नाही

तज्ञांच्या म्हणण्यानुसार केळी आणि सफरचंद एकत्र खाणे केवळ सुरक्षितच नाही तर यामुळे तुम्हाला अनेक पौष्टिक फायदेही मिळू शकतात. दोन्ही फळांमध्ये अत्यावश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर समृद्ध असतात आणि त्याचे एकत्र सेवन केल्याने दैनंदिन पोषक आहार वाढवण्याचा उत्तम स्त्रोत असू शकतो.

सफरचंद आणि केळी एकत्र खाण्याचे फायदे:

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

सफरचंदात केळी मिसळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. सफरचंदात असलेले फायबर रक्त प्रवाहात साखरेचा उत्सर्जन कमी करते. याचा अर्थ असा आहे की त्यांचे एकत्र सेवन केल्याने साखरेची जलत वाढ टाळता येते. ज्यामुळे स्थिर ऊर्जा मुक्त होते. हे संयोजन स्नॅक्स म्हणून आदर्श आहे. विशेषतः ज्यांना दिवसभर ऊर्जा पातळी स्थिर ठेवण्याच्या आवश्यकता आहे त्यांच्यासाठी.

पौष्टिक फायदे

केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्समुळे ते त्वरित ऊर्जा देतात. केळीमध्ये असलेले पोटॅशियम हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. याउलट सफरचंदामध्ये फायबर विशेषतः पेटीन भरपूर प्रमाणात असते. जे पचनास मदत करते. केळी आणि सफरचंद व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटचे देखील चांगले स्त्रोत आहेत. जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. ही दोन्ही फळे एकत्र खाल्ल्यावर तुम्हाला आवश्यक पोषक घटकांचे मिश्रण एकाच ठिकाणी मिळते जे शरीराच्या अनेक कार्यांसाठी फायदेशीर ठरते.

पचनास मदत करते

दोन फळे एकत्र खाण्याची सर्वात मोठी चिंता म्हणजे पचन तथापि केळी आणि सफरचंद यांच्या पचनास कालावधी सारखाच असतो आणि सहसा ते एकत्र चांगले पचतात. केळी बहुतेक फळांपेक्षा हळूच पचते तर सफरचंद विद्रव्य आणि अवलनशील फायबर मध्ये समृद्ध असता जे पचन प्रक्रियेस मदत करते. सफरचंदातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत चालू राहण्यास मदत होते. म्हणून हे मिश्रण प्रत्यक्षात अनेक लोकांचे पचन सुधारू शकते. दोन्ही फळे पचण्यासाठी हलकी असतात आणि एकत्र घेतल्यास त्याच्यातील फायबर सामग्रीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येतो.

या लोकांनी केळी आणि सफरचंद एकत्र खाणे टाळावे

आपल्यापैकी बहुतेकांसाठी केळी आणि सफरचंद एकत्र खाणे योग्य आहे पण ज्यांचे पोट संवेदनशील किंवा इरिटेबल बोविल सिड्रोम असलेल्या काही लोकांना फायबर सामग्रीमुळे सौम्य पचन समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत ही फळे स्वतंत्रपणे सेवन करणे किंवा संतुलित आहारात समाविष्ट करणे योग्य ठरेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.