फळे, भाज्यांचे सलाद एकत्र खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत तज्ञांकडून
फळ आणि भाज्यांचे सलाद खाने आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर सारखे आवश्यक पोषक घटक मिळत असतात पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार फळे आणि भाज्यांचे सलाद एकत्र खाण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.
रोजच्या जेवणामध्ये भाज्या आणि फळांचा समावेश करण्याचा सल्ला अनेकदा आहार तज्ञ देतात. फळे आणि भाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. ज्यांना भाज्या आवडत नाही त्यांच्यासाठी सलाद हा एक उत्तम पर्याय आहे. सलाद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काहींना फ्रुट सलाद आवडते तर अनेकांना भाज्यांचे सलाद आवडते. पण काहीजण फळ आणि भाज्यांचे सलाद एकत्र खातात. या दोन्ही गोष्टींमध्ये मोठ्याप्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, पोटॅशियम, जस्त आणि लोहा सह अनेक पोषक घटक आढळतात. दिल्ली येथील आहार तज्ञ प्रिया पालीवाल यांच्या म्हणण्यानुसार फळे आणि भाज्यांचे सलाद एकत्र खाने हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. फळे आणि भाज्यांचे सलाद एकत्र खाल्ले तर यामुळे जास्त जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर मिळतातच पण त्यासोबतच त्यामध्ये कॅलरीजही कमी असतात. फळे आणि भाज्या दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पण त्या खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भाज्या आणि फळांचे सलाद एकत्र खाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात ते तज्ञांकडून जाणून घेऊ.
योग्य संयोजन
डॉक्टर पालीवाल सांगतात की जर तुम्ही भाज्या आणि फळांचा एकत्रित सलाद खात असाल तर तुम्ही सफरचंद, गाजर आणि शलगम एकत्रित खाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन ए मिळेल. ज्यांना मधुमेह आणि किडनीचा आजार आहे त्या रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर ठरेल. फळे आणि भाज्यांचे सलाद बनवण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ धुऊन घ्या.
काळजी घेणे आवश्यक
तज्ञांच्या म्हणण्यानुसार भाज्या आणि फळे एकत्रित खाण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. काही वेळा त्या आरोग्यास हानी पोहोचू शकतात. काही भाज्या आणि फळांमध्ये असे घटक असतात जे पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. एवढेच नाही तर काही फळे आणि भाज्या एकत्रित सलादच्या रूपात खाल्ल्याने ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे ते योग्य प्रमाणातच खाण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.