Health Care | झणझणीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सतत इच्छा होते? मग जाणून घ्या दुष्परिणाम…

सध्याच्या जीवनशैलीत ताण वाढलायं. ज्याप्रमाणे तणावात साखरेची लालसा वाढू लागते, त्याचप्रमाणे या स्थितीत मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात, त्यांना तणावात ते खाण्याची जास्त इच्छा होऊ लागते.

Health Care | झणझणीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सतत इच्छा होते? मग जाणून घ्या दुष्परिणाम...
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 11:04 AM

मुंबई : कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक (Harmful) आणि धोकादायकच ठरते. अन्न आणि साखरेची लालसा काही लोकांना प्रचंड असते. इच्छा असूनही ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. शरीराला नको असेल तरीही अन्नाचे अतिरिक्त सेवन केल्याने झपाट्याने वजन वाढते. खाण्याच्या तृष्णेचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक म्हणजे मसालेदार अन्नाची लालसा. काही लोकांना मसालेदार पदार्थ (Food) इतके आवडतात की ते खाण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीत. आपल्या ओळखीमध्येही असे अनेकजण असतील ज्यांना मसालेदार, तिखट आणि झणझणीत खाद्यपदार्थ खायला प्रचंड आवडते. मात्र, कधीही अतिप्रमाण तिखट पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तिखट पदार्थांच्या सेवनामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या (Problem) निर्माण होऊ शकतात.

ताण

सध्याच्या जीवनशैलीत ताण वाढलायं. ज्याप्रमाणे तणावात साखरेची लालसा वाढू लागते, त्याचप्रमाणे या स्थितीत मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. रिपोर्ट्सनुसार, ज्या लोकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात, त्यांना तणावात ते खाण्याची जास्त इच्छा होऊ लागते. टेन्शनमध्ये मसालेदार पदार्थ खाऊन लोकांना आराम मिळतो, असेही दिसून आले आहे. जर तुम्हालाही समस्या असेल तर एकदा नक्कीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

गर्भधारणा

या काळात महिलांना मूड स्विंग्सचा सामना करावा लागतो. अन्नाशी संबंधित अनेक गोष्टी महिलांना त्रास देतात. काही प्रकरणांमध्ये स्त्रीला गोड, कधीकधी आंबटाची लालसा होते. गरोदरपणात मसालेदार अन्नाची लालसा अनेकदा निर्माण होते. गरोदर महिलांनी मसालेदार पदार्थांचे सेवन करावे. मात्र, जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

शरीराचे तापमान

शरीराच्या तापमानात बदल होत असतानाही लोकांना मसालेदार अन्न खाण्याची इच्छा होत असल्याचेही दिसून आले आहे. जेव्हा तापमान वाढते तेंव्हा मसालेदार पदार्थांचे सेवन अधिक होते. परंतु तज्ञांचे मत आहे की मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीराचे तापमान आणखी वाढू शकते. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि तुम्हाला मूळव्याध सारख्या अनेक आरोग्य समस्या देखील होऊ शकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.