एनर्जी ड्रिंक्स पित असाल तर व्हा सावध, आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक
आपली सतर्कता आणि उर्जेची पातळी वाढवणारे म्हणून एनर्जी ड्रिंक्सचा प्रचार केला जातो. त्यामध्ये साखर आणि कॅफेनचे प्रमाण खूप जास्त असते.
नवी दिल्ली – एका रिपोर्टनुसार, एका अमेरिकन व्यक्तीला 10 मिनिटांत एनर्जी ड्रिंकचे 12 कॅन्स (energy drinks) प्यायल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर, कॅफेन आणि केमिकल्सचं प्रमाण जास्त असल्याने या ड्रिंक्सचे 36 वर्षीय पुरुषाच्या स्वादुपिंडाचे स्वत:चं पचन (pancreas began digesting itself) होऊ लागल्याची माहिती समोर आली. एनर्जी ड्रिंकचे 12 कॅन्स प्यायलेल्या या व्यक्तीची प्रकृती (health issue) खालावल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एनर्जी ड्रिंक्सना कधीकधी स्पोर्ट ड्रिंक्सही समजले जाते, मात्र ते त्यापेक्षा वेगळे असतात.
आपली सतर्कता (alertness) आणि उर्जेची पातळी (energy booster) वाढवणारे म्हणून एनर्जी ड्रिंक्सचा प्रचार केला जातो. त्यामध्ये कॅफेनचे प्रमाण खूप जास्त असते. आणि सोडायुक्त पेयांइतकी अथवा त्यापेक्षाही अधिक प्रमाणात साखर असते. काही एनर्जी ड्रिंक्समध्ये 2 कप कॉफीइतके जवळपास 200 मिलिग्रॅम कॅफेनही असते.
सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे या एनर्जी ड्रिंक्सच्या सुरक्षिततेबाबत नियमनाचा अभाव आहे. तसेच तरुणांना आकर्षित करण्यासाठी या पेयांचे आक्रमकपणे मार्केटिंग केले जाते. 2007 साली 12 ते 17 या वयोगटातील 1145 मुलांना एनर्जी ड्रिंक्समुळे इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते, असे रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने (Centers for Disease Control and Prevention) सांगितले. तर 2011 साली हा आकडा 1499 पर्यंत वाढला होता.
कॅफेनच्या हाय डोसमुळे हायपरटेन्शन, पल्पिटेशन, कॅल्शिअमची कमतरता निर्माण होणे यासह अनेक समस्या उद्भवू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले.
लाँग टर्म रिस्क
एनर्जी ड्रिंक्समध्ये साखर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुथे ते पिणाऱ्यांच्या दातांचे नुकसान होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले. या पेयांमध्ये असलेली साखर दातांचे एनॅमल खराब करू शकते, ज्यामुळे कॅव्हिटी आणि दात अतिसंवेदनशील होणे, यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच काळासाठी एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यास शरीराच्या मेटाबॉलिजमवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी असंतुलित होऊ शकते.
एका अहवालातून अशी माहिती समोर आली आहे की, एनर्जी ड्रिंक्सचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे मानसिक आरोग्य खराब होणे, हृदय व रक्तवाहिन्यावर तसेच मेटाबॉलिजमवर वाईट परिणाम होऊ शकतो. किंवा दाताच्या समस्या उद्भवू शकतात. , कॅफेनची अधिक मात्रा, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, कमी-कॅलरी स्वीटनर आणि हर्बल उत्तेजकांसह असलेली साखर मुलांवर अधिक परिणाम करू शकते.
कॅफेनचे दुष्परिणाम
एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेल्या घटकांपैकी कॅफेन हा सर्वात सामान्य घटक असल्याने त्याचे दुष्परिणाम समजून घेणे महत्वाचे ड्रिंक्समध्ये असलेले कॅफेन हे एकाग्रता आणि सतर्कता वाढविण्यासाठी आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये, या कॅफेनमुळे अस्वस्थता, हृदयाचा ठोका वाढणे आणि निद्रानाश यासारख्या काही लक्षणे उद्भवू शकतात.
हार्वर्डच्या एका अहवालानुसार, एखाद्या डोसमध्ये 1.2 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त कॅफेन असेल तर ते पिणाऱ्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एकावेळी 10 ते 14 ग्रॅम कॅफेनचे सेवन करणे अतिशय घातक मानले जाते. 10 ग्रॅम पर्यंत कॅफिनचे सेवन केल्याने पेटके येणे आणि उलट्या होणे, असा त्रास होऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ (NCCIH) च्या मते, आपण किती कॅफिन घेता हे आपल्या हृदयाची धडधड आणि रक्तदाब किती वेगवान वाढवू शकते यावर अवलंबून असते.