Covid Test : घरीच करा कोव्हिड चाचणी, सेल्फ टेस्टिंग कीट आता ऑनलाइन उपलब्ध

| Updated on: Jan 10, 2022 | 9:56 PM

कोव्हिड -19 चा व्हेरियंट 'ओमायक्रॉननने' सध्या भारतात करोनाची तिसरी लाट आणू पाहत आहे. अगदी महिनाभरात भारतातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढली. अशावेळी बाजारात सध्या सेल्फ टेस्टिंग कीटस उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे तुम्ही घरीच बसून तपासणी करू शकता.

Covid Test : घरीच करा कोव्हिड चाचणी,  सेल्फ टेस्टिंग कीट आता ऑनलाइन उपलब्ध
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : भारतात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढली. तसे इंडियन काऊन्सिंल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR) संस्थेने सेल्फ टेस्टिंग कीटला परवानगी दिली. लँबवर आलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निर्देशानुसार लक्षणे असलेली व्यक्ती किंवा रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी टेस्ट कीट उपयोगी पडणार आहे विशेष म्हणजे या टेस्ट कीट तुम्ही ऑनलाइन मागवू शकता.

मायलँब कोव्हीसेल्फ : मायलँबचे टेस्ट कीट अँमेझॉनवर 250 रूपयात उपलब्ध आहे. 18 वर्षे आणि 18 वर्षांवरील दोन वर्षे वयोगटातील व्यक्तीचे नमुन( sample) यात वापरता येतात. यासाठी अगोदर कोव्हीसेल्फ अँपवर नोंदणी करावी लागेल. अँपवरच रिझल्ट मिळेल. डिस्पँच ऑर्डरच्या सहा महिन्यापर्यंत हे प्रॉडक्ट वापरता येईल.

पँनबायो कोव्हिड-19 अँटीजेन टेस्ट : ही सिंगल युजड टेस्ट कीट आहे. यामध्ये नाकावाटे टेस्ट करता येते. तसे साहित्य कीटमध्ये असते. जर तुम्ही कोव्हिड-19 चे अँक्टिव्ह असेल तर तुम्हाला अवघ्या 15 मिनिटात तुम्हाला रिझल्ट मिळेल. आयसीएमआरची मान्यता मिळालेली ही टेस्ट कीट अँमेझॉनवर 249 रूपयात उपलब्ध आहे.

कोव्हीफाइंड रँपिड अँन्टेजन टेस्ट कीट : या कीटने 15 मिनिटात रिझल्ट मिळतो. या कीटमध्ये ट्यूब, टेस्ट डिव्हाईस, डिस्पोसेबल बँग आणि माहितीपुस्तक (manual) असते. प्री-फील्ड बफर ट्यूब, एक निर्जंतुक केलेली नाकावाटे घेतला जाणारा नमुना, टेस्ट डिव्हाईस, डिस्पोजेबल बँग आणि माहिती असते. अमेझॉनवर ही टेस्ट कीट 242 रूपयात उपलब्ध आहे.

अल्ट्रा कोव्ही- कँच रँपिड अँन्टीजेन टेस्टः फ्लिपकार्टवर 275 रूपयात उपलब्ध असलेल्या या कीटमध्ये वेगवेगळे सेंन्सर आहेत. अल्ट्रा कोव्ही-कँच- एसडी बायोसेंन्सर कंपनीने कोव्हिडची रँपिड अँन्टीजेन टेस्ट भारतात पहिल्यांदा उपलब्ध केली. आयसीएमआरची मान्यता मिळालेल्या या कीटमध्ये 15 मिनिटात रिपोर्ट मिळतो. जर रिपोर्ट जर कीटची कंट्रोल लाइन ( C) आणि टेस्ट लाइन ( T) स्पष्ट दिसून येत. रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर ती दिसत नाही.

अँन्गकार्ड कोव्हिड -19 अँन्टीजेन टेस्ट : टेस्ट कीटच्या पर्यायात फ्लिपकार्टवर 1350 रूपयात उपलब्ध आहे. यामध्ये 25 नेझल स्वँब, ट्यूब सारखे साहित्य असते. वापर केल्यावर ही स्ट्रीप 15 मिनिटात करायला हवी.

टेस्ट कीटचा वापर करण्यापूर्वी

कोणतीही सेल्फ टेस्ट कीट वापरण्यापूर्वी घरातील स्वच्छ जागा निवडा. आपले हात सँनिटाइज करा. अँपवरून सगळी माहिती डाऊनलोड करा. ओळखपत्र भरा आणि नंतर कीट वापरा.

सेल्फ टेस्ट कीटमध्ये पॉझिटिव्ह असाल तर पुन्हा इतर कोणत्याही टेस्टची गरज नाही. लक्षण असलेल्या व्यक्तींनी टेस्ट निगेटिव्ह आली असेल तर आरटीपीसीआर करावी. कीटच्या टेस्ट रिपोर्टनुसार तुम्ही पॉझिटिव्ह आला असाल तर आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या प्रोटोकॉलनुसार तुम्ही होम आयसोलेशनमध्ये रहा.

www.icmr.gov.in वर मार्गदर्शक तत्व बघता येतील. लक्षणे असलेल्या व्यक्तींची टेस्ट निगेटिव्ह असेल आणि तरीही आरटीपीसीआर करावी. कदाचित रँपिड अंन्टीजेन टेस्टमध्ये त्रुटी असू शकतात. मान्यताप्राप्त टेस्ट कीटचाच वापर करा आणि दिलेल्या सुचनांचे पालन करूनच कीट वापरा. या टेस्ट कीटमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आला तरीही तुम्ही कोव्हिड संशयित असू शकता. त्यामुळे आरटीपीसीआर करा किंवा होम आयसोलेशनमध्ये रहा.

इतर बातम्या

कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा लहान मुलांसाठी ओमिक्रॉन अधिक घातक?, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Turmeric side effects : या कारणांमुळे हळदीचे अति सेवन ठरू शकते धोकादायक