AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Essential Vitamins : ‘ही’ सहा जीवनसत्त्वे शरीरासाठी आहेत आवश्यक; फायदे जाणून घ्या

जीवनसत्त्वे (Vitamins) हे आपल्या शरीरासाठी लागणारा सर्वात आवश्यक असा घटक आहे. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा (Illness) सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी (health) खूप फायदेशीर असतात.

Essential Vitamins : 'ही' सहा जीवनसत्त्वे शरीरासाठी आहेत आवश्यक; फायदे जाणून घ्या
व्हिटॅमिन
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 10:55 PM
Share

जीवनसत्त्वे (Vitamins) हे आपल्या शरीरासाठी लागणारा सर्वात आवश्यक असा घटक आहे. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजारांचा (Illness) सामना करावा लागू शकतो. जीवनसत्त्वे आरोग्यासाठी (health) खूप फायदेशीर असतात. ते शरीराच्या प्रत्येक कार्याला चालना देताता. प्रत्येक जीवनसत्त्वाचे कार्य वेगवेगळे असते. जर तुमच्या शरीरात एखाद्या जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर तुम्हाला त्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उदा: जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी असेल तर तुम्हाला, हाडे दुखणे, थकवा येणे, कामात उत्साह न वाटणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात जीवनसत्त्वांची पातळी योग्यप्रमाणात राहण्यासाठी तज्ज्ञांकडून आहारात विविध पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देण्यात येतो. तुमच्या शरीरासाठी कोणते जीवनसत्त्वे आवश्यक आहे, त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन ए

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, दृष्टी दोष दूर होण्यासाठी तसेच त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमतरता असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. तसेच डोळ्यांशी संबंधित विविध समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी मध्ये B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 अशा आठ प्रकारांचा समावेश होतो. हे सर्व व्हिटॅमिन शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. व्हिटॅमिन बी हे तुमच्या मज्जासंस्थेसाठी अत्यंत गरजेचे असते. दही, दूध, केळी आणि मशरूमच्या सेवनातून तुम्हाला व्हिटॅमिन बी मिळू शकते.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सीला एस्कॉर्बिक ऍसिड असेही म्हणतात. व्हिटॅमिन सी हे सर्वात महत्वाच्या जीवनसत्त्वांपैकी एक आहे. हे केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर त्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. ते शरीराला हानी पोहोचवणारे मुक्त रॅडिकल्स रोखण्यात मदत करतात. हे तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

व्हिटॅमिन डी

कॅल्सीफेरॉल सामान्यतः व्हिटॅमिन डी म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन डी हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. कारण ते हाडे आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डी मेंदूच्या कार्याला देखली चालना देते. कवळे ऊन हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्त्रोत आहे.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसाच्या उत्तम आरोग्यसाठी गरजेचे असते. व्हिटॅमिन ईमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई मुळे चयापचयाची प्रक्रिया अधिक गतीमान होते. शेंगादाने हा व्हिटॅमिन ईचा उत्तम स्त्रोत आहे.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के हे तुम्हाला विविध प्रकारच्या कर्करोगापासून दूर ठेवण्याचे कार्य करते. विविध प्रकारच्या पालेभाज्या तसेच मासे हे व्हिटॅमिन केचे उत्तम स्त्रोत आहेत.

संबंधित बातम्या

ज्या आजारामुळे बप्पी लाहिरींनी जीव गमावला त्याची लक्षणे माहितीय का?

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! चुटकीसरशी दुखणं गायब करणारा उपाय

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.