Sign of unhealthy Kidney: जास्त थकवा येणे हे असू शकते खराब किडनीचे लक्षण

किडनी हा शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. हे शरीरातील खराब आणि अतिरिक्त द्रव काढून टाकते.

Sign of unhealthy Kidney: जास्त थकवा येणे हे असू शकते खराब किडनीचे लक्षण
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 1:52 PM

किडनी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर काही दिवसांसाठी किडनीचे (kidney) काम पूर्णपणे बंद केले तर आपल्या शरीरात विष तयार होण्यास सुरुवात होईल आणि गंभीर परिस्थिती ओढवू शकेल. खरंतर, किडनी ही शरीरातील खराब द्रव पदार्थ फिल्टर करते. या वाईट द्रवपदार्थामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतात. किडनी ते पदार्थ बाहेर फेकते. यासह, किडनी ही हार्मोन्स (hormones) तयार करण्यात आणि इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करते. सोप्या भाषेत सांगायचे तर किडनी रक्त स्वच्छ करते आणि त्यातून विष (toxins) बाहेर काढते. म्हणजेच किडनी मूत्रावाटे शरीराची घाण काढून टाकते.

किडनीची शरीरातील भूमिका पाहता किडनीची स्वच्छताचा अथवा डिटॉक्सिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे किडनी निरोगी राहते. जर शरीर निरोगी असेल आणि पुरेसं पाणी आणि आवश्यक पोषक द्रव्यं मिळाली तर किडनी स्वत:ची स्वच्छता स्वत: करतात, पण आवश्यक पोषक तत्वांचा अभाव असेल तर किडनीवर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. किडनी कशी साफ करावी, हे जाणून घेऊया.

किडनी निरोगी आहे की नाही, कसे समजेल ? सर्वात प्रथम, किडनी निरोगी आहे की नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा थेट परिणाम लवकर जाणवत नसला तरी काही सुरुवातीच्या लक्षणांच्या आधारे हे समजू शकते की किडनी निरोगी नाहीये, आणि त्यानंतर रोग होण्याचा धोका असतो. नेहमी थकवा येणे, नीट झोप न येणे, वारंवार लघवी होणे, लघवीमध्ये रक्त येणे, लघवीच्या वेळी जळजळ अथवा वेदना होणे, त्वचा कोरडी पडणे, पाय, घोटे यांना सूज येणे, पोट दुखणे, असा त्रास होत असेल तर किडनी निरोगी नाही, हे समजावे.

हे सुद्धा वाचा

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे ?

पुरेसे पाणी प्या – हेल्थलाइनच्या बातमीनुसार, मानवी शरीरात 70 टक्के पाणी असते. मेंदूपासून लिव्हरपर्यंत आपलं काम करण्यासाठी पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी पिऊन किडनी टाकाऊ द्रव्ये गाळते. कमी पाणी प्यायल्यास कमी लघवी बाहेर येईल. कमी लघवी म्हणजे किडनी निकामी होणे आणि किडनी स्टोन तयार होऊ शकतो.

द्राक्षं – द्राक्षं, शेंगदाणे, जांभूळ, स्ट्रॉबेरी यासारख्या फळांमध्ये किडनीतील कोणत्याही प्रकारची सूज दूर करण्याची क्षमता असते. ही फळे पॉलिसिस्टिक किडनीच्या आजारापासून संरक्षण करतात.

लिंबू व संत्र्याचा रस – लिंबू, संत्री, कलिंगड या फळांच्या रसांमध्ये सायट्रिक अॅसिड असते. सायट्रिक अॅसिडमुळे किडनीमध्ये मूतखडा तयार होण्यास प्रतिबंध होतो. हे कॅल्शियम क्रिस्टल्सच्या वाढीस प्रतिबंध करते. कॅल्शियम क्रिस्टल्समुळे किडनी स्टोन होऊ शकतात.

बदामाचे दूध – कॅल्शियमयुक्त गोष्टी खाल्ल्याने किडनी स्टोन होतात, असा अनेक लोकांचा समज असतो, मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. जास्त प्रमाणात लघवी ऑक्सलेटमुळे किडनी स्टोन होऊ शकते. ऑक्सलेट रोखण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यामुळे कॅल्शियमयुक्त वस्तू खाल्ल्याने किडनी मजबूत होते. यामध्ये सोया आणि बदामाचे दूध यांचे सेवन करणे फायदेशीर आहे.

व्हिटॅमिन बी -6 आणि ओमेगा 3 एस- व्हिटॅमिन बी 6 हे मेटाबॉलिज्म रिॲक्शनसाठी कोफॅक्टर म्हणून काम करतात. या व्यतिरिक्त ओमेगा 3 एस हे किडनीची सूज कमी करण्याचे काम करते. त्यामुळे मासे, पालक, हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन अधिक करावे. याशिवाय कोबी, अंडी तसेच कांदा किडनी क्लींजर म्हणूनही काम करतात.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.