Green Tea Side Effects: गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी पीत असाल तर व्हा सावध, होऊ शकते नुकसान!

ग्रीन टी हा वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, परंतु त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याचे नुकसान ही होऊ शकते.

Green Tea Side Effects: गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी पीत असाल तर व्हा सावध, होऊ शकते नुकसान!
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 5:14 PM

नवी दिल्ली – आजकाल प्रत्येक व्यक्ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. स्लिम (slim) राहण्यासाठी लोक वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. ग्रीन टी, या उपायांपैकीच एक आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक ग्रीन टीचा (green tea) आधार घेतात. इतकंच नव्हे तर पटकन बारीक व्हावं या इच्छेपायी अनके व्यक्ती सतत मोठ्या प्रमाणात ग्रीन टीचं सेवन करतात. जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे (excess drinking of green tea) हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, हे तुम्हाला माहीत आहे ? ग्रीन टीमुळे काय नुकसान होते, जाणून घेऊया.

झोपेत अडथळा

हे सुद्धा वाचा

ग्रीन टीमध्ये कॅफेनचे प्रमाण खूप कमी आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायलात तर मेलाटोनिन हार्मोनचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे आपल्या झोपेच्या पॅटर्नमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे आपली झोप बिघडू शकते अथवा अपुऱ्या झोपेचा त्रास होऊ शकतो.

डोकेदुखीचा त्रास

ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने डोकेदुखी देखील होऊ शकते. जर तुम्ही दिवसातून 2 ते 3 कप ग्रीन टी पीत असाल तर ते हानिकारक नाही. पण त्यापेक्षाही जास्त ग्रीन टी पीत असाल तर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

पचनाची समस्या

ग्रीन टीमध्ये टॅनिन आढळते, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. त्यामुळे जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास पोटात जळजळ, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता अशा समस्याही उद्भवू शकतात.

ॲनिमिया

जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमतरता निर्माण होते. जास्त ग्रीन टी प्यायल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता वाढते.

उलटी होणे

ग्रीन टीमध्ये असलेले टॅनिन हेसुद्धा त्रासदायक ठरू शकते. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने आतड्यातील प्रोटीनचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे तुम्हाला उलटी, मळमळ असा त्रास जाणवू शकतो.

ब्लड प्रेशरवर परिणाम

ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्याने ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबावरही खूप परिणाम होतो. खरंतर, ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. तसेच तुम्ही हार्ट पेशंट असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ग्रीन टी पिऊ नये.

हाडे ठिसूळ होतात

जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने तुमची हाडं कमकुवत किंवा ठिसूळ होऊ शकतात. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस यासारखा आजार होण्याची शक्यता वाढते.

(डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.