AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC Side Effects : दिवसभर खाता एसीची हवा ? व्हा सावध, या गंभीर आजारांना बळी पडू शकता

उन्हाळा सुरू होताच एसीचा वापर दणादण वाढतो. पण जास्त काळ एसीचा वापर केल्याने केवळ आरोग्याच्या नव्हे कर त्वचेच्या पण समस्या उद्भवू शकतात. एसीच्या अतीवापराचे दुष्परिणाम जाणून घेऊया.

AC Side Effects : दिवसभर खाता एसीची हवा ? व्हा सावध, या गंभीर आजारांना बळी पडू शकता
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 1:43 PM

नवी दिल्ली : वाढत्या तापमानासह उन्हाळ्याचे (summer) आगमन झाले आहे. बदलत्या हवामानासोबत आता आपली जीवनशैलीही बदलत आहे. बदलत्या ऋतूने खाण्यापिण्यापासून ते पेहरावापर्यंत सर्व काही बदलले आहे. थंडीचे उबदार कपडे, ब्लँकेटस, हिटर आता कपाटात परत गेले असून साधे, सुती कपडे घालण्याचा, माठातील पाणी (cold water in Matka) पिण्याचा ऋतू आला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळा येताच लोकांनी एसीचा (AC) वापर सुरू केला आहे. या ऋतूमध्ये दिवसभर एसीतच राहणारे अनेकजण असतात.

कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना एसीपासून थोडा वेळही दूर राहता येत नाही. पण एसीचा सतत वापर तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच नव्हे तर त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. एसीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या पाच गंभीर समस्यांबद्दल जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

डिहायड्रेशन

जल हे जीवन आहे. पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते, हे सर्वांनाच माहीत असते. त्याचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. तसेच शरीरातील अनेक कार्य सुरळीत चालण्यासाठीही पुरेशा प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे असते. पण उन्हाळ्यात अनेक लोक कमी पाणी पितात व त्यांना डिहायड्रेशनचा त्रासही होऊ लागतो. पण तुम्हाला माहित आहे का की ही समस्या फक्त पाण्याच्या कमतरतेमुळेच नाही तर एसीच्या अतिवापरामुळे देखील होऊ शकते. खरं तर, ज्या खोलीत एसी जास्त वापरला जातो, त्या खोलीतील वातावरणातील आर्द्रता सुकते, ज्यामुळे शरीराचे निर्जलीकरण होऊ लागते.

अस्थमा

जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर सतत एसी वापरणे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. वास्तविक, एसीची योग्य स्वच्छता न केल्यामुळे, त्यातील धुळीमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. इतकेच नाही तर एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने नाकाचा पॅसेजही कोरडा होतो, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

डोकेदुखी

जर तुम्ही दिवसभर एसी सतत वापरत असाल तर त्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते. खरंतर, वातानुकूलित खोली आणि बाहेरचे तापमान यात खूप फरक असतो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही एसीमुळे झालेल्या थंड वातावरणातून बाहेरील गरम तापमानात जाता तेव्हा डोकेदुखी होऊ शकते. हे विशेषतः मायग्रेनच्या रुग्णांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.

कोरडी त्वचा

एसीचा अतिरेक आपल्या आरोग्यावर तर वाईट परिणाम करतोच पण त्यामुळे आपल्या त्वचेवरही विपरीत परिणाम होतो. वास्तविक, एसी सतत सुरू राहिल्यामुळे त्या खोलीतील आणि वातावरणातील आर्द्रता कमी होऊ लागते, त्यामुळे आपली त्वचाही कोरडी होते. एवढेच नाही तर एसीच्या वापरामुळे केस आणि डोळेही कोरडे होतात. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होऊ लागते तसेच केसगळतीही सुरू होऊ शकते.

मेंदूवर वाईट परिणाम

जर तुम्ही सतत एसी वापरत असाल तर त्याचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. वास्तविक, एसीच्या अत्यंत कमी तापमानामुळे मेंदूच्या पेशी आकुंचन पावू लागतात. त्यामुळे मेंदूची क्षमता आणि कार्यप्रणाली प्रभावित होते. यासोबतच सतत एसीत बसल्यामुळे चक्कर येण्याचा त्रासही अनेकांना होतो.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.