Sugar | साखर नको.. मध खा.. आपल्याकडे सल्ल्यांची काही कमी नाही! पण दुष्परिणामही वाचायला हवेत!
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधामध्ये आढळणारे फ्रक्टोज हे साखरेचे मुख्य स्त्रोत आहे आणि ते खाल्ल्याने यकृताचच्या समस्या निर्माण होऊ शकतात. असे म्हटले जाते की यकृताद्वारे फ्रक्टोजचे चयापचय होते आणि अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना समस्या उद्भवू शकतात.
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, मध (Honey) खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. इतकेच नव्हेतर मध आणि कोमट पाणी मिक्स करून पिल्याने आपले वाढलेले वजन झटपट कमी होण्यासही मदत होते. मधामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात जसे की कार्बोहायड्रेट, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन सी, बी कॅल्शियम, फॉस्फरस पोटॅशियम. मात्र, मधाचे अतिसेवनही आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत धोकादायक आहे. मध जरीही आरोग्यासाठी फायदेशीर (Beneficial) असेल तरीही अनेकांनी मधाचे सेवन करण्यापूर्वी नक्कीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
यकृताच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधामध्ये आढळणारे फ्रक्टोज हे साखरेचे मुख्य स्त्रोत आहे आणि ते खाल्ल्याने यकृताचच्या समस्या निर्माण होऊ शकतात. असे म्हटले जाते की यकृताद्वारे फ्रक्टोजचे चयापचय होते आणि अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना समस्या उद्भवू शकतात.
मधुमेहाच्या रूग्णांची समस्या वाढणार
मधुमेह या आजाराने त्रस्त असलेल्यांनी कोणत्याही प्रकारची साखर खाणे टाळावे. मधामध्ये असलेले फ्रक्टोज हे साखरेचे स्त्रोत मानले जाते. फ्रुक्टोजमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी बिघडू शकते. यामुळेच ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, अशांनीही मधचे सेवन अजिबात करू नये.
हिरड्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता
जरी मधामध्ये नैसर्गिक साखर असते. परंतु ज्यांना दातांमध्ये पोकळी किंवा हिरड्यांचे आरोग्य बिघडण्याची समस्या आहे त्यांनी यापासून दूर राहावे. नाहीतर आपल्या दातांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे ज्यांना दातांसंदर्भात तक्रारी आहेत, त्यांनी मधाचे सेवन करू नये.
वजन झटपट वाढणार
अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मात्र, साखर खाल्ल्याने वजन वाढते, यामुळे अनेकजण आपल्या आहारामध्ये साखर न खाता मधाचा समावेश करतात. मात्र, अतिप्रमाणात मधाचे सेवन केल्याने वजन वाढण्याची 100 टक्के शक्यता असते.
(वरील माहिती सामान्य ज्ञानांवर आधारित आहे, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)