ॲंटीबायोटिक्सचे अतिसेवन ठरू शकते घातक, तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे द्या लक्ष

ॲंटीबायोटिक्सचे जास्त सेवन केल्याने ॲंटीबायोटिक्स रेझिस्टन्स होऊ शकतो. ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात असलेल्या बॅक्टेरियावर औषधांचा काही परिणाम होत नाही.

ॲंटीबायोटिक्सचे अतिसेवन ठरू शकते घातक, तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे द्या लक्ष
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 10:53 AM

कोरोना (corona) महामारीच्या काळापासून देशभरात ॲंटीबायोटिक्सच्या सेवनात लक्षणीायरित्या ढ झाली आहे. ‘ द लॅन्सेट रिजनल हेल्थ जनरल ‘ या वैद्यकीय नियतकालिकातील (medical journal) अहवालात म्हटले आहे की, २०१९ साली देशात ५०० कोटी ॲंटीबायोटिक्सचे सेवन करण्यात आले होते. कोरोनानंतर हा आकडा आणखीच वाढला आहे. ही ॲंटीबायोटिक्स ओव्हर-द-काउंटर मिळत असल्यामुळे, लोक त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच घेत आहेत. अनेक वेळा औषधांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतरही लोकं त्या औषधांचे सेवन करत, पण ॲंटीबायोटिक्सचे अतिसेवन घातक ठरू शकतं, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. यामुळे ॲंटीबायोटिक रेझिस्टन्सचा (resistance) धोका देखील असतो.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एखाद्या व्हायरसप्रमाणे बॅक्टेरियाही स्वत:मध्ये बदल करत राहतात आणि त्यांची क्षमता वाढवतात. औषधामुळे तयार झालेल्या प्रतिकारशक्तीशी ते लढतात, पण जर एकच औषध सलग घेतले गेले, तर बॅक्टेरिया त्यांना ओळखतात. ते म्यूट होतात आणि स्वत: ला अशा प्रकारे रोगाविरूद्ध तयार करतात, की पूर्वी वापरल्या जाणाऱ्या ॲंटीबायोटिक्सचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. हे बॅक्टेरिया औषधाविरूद्ध रेझिन्स्टन्स (प्रतिरोध) विकसित करतात. या अवस्थेला ॲंटीबायोटिक रेझिस्टन्स म्हटले जाते. ॲंटीबायोटिक रेझिस्टन्समुळे अनेक आजारांवर उपचार करणं कठीण होत चालले आहे. सामान्य फ्ल्यू, अन्नातून होणारी विषबाधा आणि खाण्या-पिण्यामुळे होणारे काही आजार या आजारांविरुद्ध बॅक्टेरिया प्रतिकार (रेझिस्ट्न्स) दर्शवत आहेत.

ॲंटीबायोटिक रेझिस्टन्स का होतो ?

डॉ. अजय सिंह यांच्या सांगण्यानुसार, ॲंटीबायोटिक रेझिस्टन्सची दोन मुख्य कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अनेक वेळा रुग्णाला अगदी सौम्य संसर्ग झाला असला तरी त्याला औषध दिले जाते, त्याला त्यावेळी औषधाची गरज नसते. दुसरं कारण म्हणजे, अनेक वेळा आजार इतर जिवाणूंमुळे होतो, पण औषध वेगळं दिलं जातं. तसेच एकच औषध अनेक वेळा घेतल्यानेही ॲंटीबायोटिक रेझिस्टन्सची ही समस्या उद्भवते.

डॉक्टरांच्या मते, ॲंटीबायोटिक्सचे अतिसेवन करणे हे प्राणघातक देखील ठरू शकते. तसेच त्यामुळे अनेक प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका असतो. 2014 मध्ये, ॲंटीबायोटिक्स वर करण्यात आलेल्या एका संशोधनात असे म्हटले गेले आहे की, परजीवी (पॅरासाइट) किंवा बॅक्टेरियाच्या नोंदणीमुळे त्यावर्षी जगभरात 6 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2050 सालापर्यंत हा आकडा 10 दशलक्ष इतका होऊ शकतो. अशा परिस्थितीत, लोकांनी विनाकारण ॲंटीबायोटिक्सचे सेवन करू नये आणि कोणत्याही छोट्याशा आजारासाठी औषध घ्यावं लागणार नाही, असा प्रयत्न करावा.

औषधांचा कोर्स पूर्ण करा –

डॉ. कुमार यांच्या मते, लोकांनी ॲंटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण केला पाहिजे. तसेच डॉक्टरांनी ज्या कालावधीसाठी औषधे दिली आहेत, केवळ तेवढाच काळ औषधं घ्यावीत. त्यानंतर उगाचच औषधे घेत राहू नये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.