स्मार्टफोनच्या अतिवापराने होऊ शकतो Nerve pain चा त्रास, आजार वाढल्यास उद्भवते गंभीर परिस्थिती
Nerve pain Diseases : स्मार्टफोन वापरताना, लोक अनेक तास एकाच मुद्रेत राहतात, ज्यामुळे नसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.

नवी दिल्ली : आजकाल स्मार्टफोन (smartphone )हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फोनशिवाय आयुष्य अपूर्ण होते. पण स्मार्टफोनचा अतिवापर आपल्याला आजारी बनवत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत आहे. यामध्ये मज्जातंतूच्या वेदनांची ( Nerve pain)अधिक प्रकरणे समोर येत आहेत. नर्व्ह पेनमुळे खूप त्रास होत आहे. Nerve pain ला नसांचे दुखणे म्हणतात. वैद्यकीय भाषेत त्याला न्यूरोलॉजी आजार म्हणतात.
न्यूरोलॉजी रोग का होतो आणि त्याची प्रकरणे वाढण्याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊया. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोन वापरताना लोक अनेक तास एकाच मुद्रेत, स्थितीत बसता. ज्यामुळे नसांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. न्यूरोलॉजी देखील यामुळे होते. या आजारात मज्जातंतूमध्ये वेदना होतात. मज्जातंतूची वेदना कोणत्याही भागात उद्भवते. त्याचा शरीरात कुठेही परिणाम होऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, मान आणि खांद्यावर अधिक परिणाम होतो.
सतत वाढतोय हा त्रास
न्यूरोसर्जन डॉ.राजेश कुमार सांगतात की, तासनतास मोबाईल वापरल्याने नसांमध्ये तणाव निर्माण होतो. गेल्या काही वर्षांपासून मान आणि हात दुखण्याचीही समस्या वाढत आहे. मनगट, कोपर आणि खांद्यामध्येही वेदना होतात. असे अनेक रुग्ण त्यांच्याकडे येतात ज्यांची मान आणि मनगट दुखत असते. या लोकांशी बोलल्यावर कळते की ते तासनतास फोन वापरतात. बहुतेक लोक कार्यालयीन कर्मचारी आहेत.
कुमार यांनी सांगितले की, स्मार्टफोनच्या वापराशिवाय मधुमेह, सिफिलीस आणि लाइम रोगामुळे देखील मज्जातंतूमध्ये वेदना किंवा सूज येते. मज्जातंतूचे दुखणे ही अशी समस्या आहे जी सहजासहजी संपत नाही. ही वेदना काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत टिकू शकते. अनेक प्रकरणांमध्ये, नसा देखील कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. यासोबतच झोप न लागणे आणि अपचन होण्याचा धोकाही असतो.
न्यूरोलॉजियाची लक्षणे
मान दुखी
हात सुन्न होणे
अचानक हात आणि मान दुखणे
मज्जातंतूमध्ये वेदना होणे
असा करावा बचाव
स्मार्टफोनचा अनावश्यक वापर करू नका
अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोन हातात धरू नका
फोन पकडताना हाताची स्थिती, बसण्याची स्थिती योग्य ठेवावी