बापरे! कोरोना नसतानाही ब्लॅक फंगस होतो?; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव जात आहेत. केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करताना पाहायला मिळतेय.

बापरे! कोरोना नसतानाही ब्लॅक फंगस होतो?; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
ब्लॅक फंगस
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 12:19 PM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव जात आहेत. केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करताना पाहायला मिळतेय. पण अशावेळी कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसचा धोका वाढला आहे. ब्लॅक फंगसच्या वाढत्या केस पाहुण अनेक राज्यांनी तर महामारीची घोषणा केली आहे. (Experts say that black fungus occurs in the absence of corona)

विशेष म्हणजे हा ब्लॅक फंगस फक्त कोरोनाच्या रूग्णांनाच होतो, असे नाही तर ब्लॅक फंगस कोरोना नसलेल्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. यामुळे धोका अधिक वाढला आहे. विशेष करून या ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका हा ब्लड शुगर असलेल्या व्यक्तीला आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे की, ब्लॅक फंगस कोविडच्या आधीही होतो. मधुमेहाच्या रुग्णांना देखील ब्लॅक फंगस होऊ शकतो. ज्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये नाही अशा व्यक्तींना या संसर्गाचा धोका अधिक आहे. म्हणून यादरम्यान मधुमेह असलेल्या रूग्णांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

मधुमेहाच्या रूग्णांना जास्त धोका डॉ. पॉल म्हणाले की, ज्यांच्या साखरेची पातळी 700 ते 800 पर्यंत पोहोचते, ज्याला मधुमेह केटोएसिडोसिस देखील म्हटले जाते. त्यांना ब्लॅक फंगसचा धोका असू शकतो. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत कोणालाही ब्लॅक फंगस होऊ शकतो. त्याच बरोबर, एम्सचे डॉ. निखिल टंडन म्हणाले आहेत की, निरोगी लोकांना या संसर्गाची चिंता करण्याची गरज नाही.

ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे, त्यांना फक्त जास्त ब्लॅक फंगसचा धोका आहे. डॉ. टंडन पुढे म्हणाले की, कदाचित कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने रोगप्रतिकारक शक्तीला पहिल्यापेक्षा जास्त आक्रमण केले असेल, ज्यामुळे ब्लॅक फंगसच्या केस पुढे आल्या. मात्र, सध्या यावर काही जास्त बोलताना येणार नाही. तोपर्यंत योग्य तपासणी होणार नाहीत.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Experts say that black fungus occurs in the absence of corona)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.