मुंबई : आंखो मे तेरी अजब सी अजब सी अदाये है….डोळे (Eye) सांगतात आपल्या भावना…डोळे अनेक वेळा आपल्या मनातील गुपित सांगतात. डोळे आपलं सौंदर्यही वाढवतात. आपण म्हणतो तुझे डोळे खूप बोलके आहेत. तुमच्या कधी लक्षात आलं का. बरं नसताना डॉक्टर पहिले आपले डोळे तपासतात. डोळे आणि आजार (Health) यांचा खूप घनिष्ट संबंध आहे. डोळ्यातून आपल्याला आजाराविषयी कळतं. डोळे आपल्या शरिरातील सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे. डोळ्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तुमच्या डोळ्यात काहीही बदल दिसत असेल तर वेळीच सावध व्हा. हे बदल तुम्हाला एखाद्या आजाराबद्दल सावधान (warning) करतात. हे बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरकडे जा. डोळ्यातून कसं आजाराबद्दल गुपित कळू शकतं ते सांगणार आहोत.
तुमच्या डोळ्यात सतत पाणी येत आहे. याकडे दुर्लक्ष करु नका तुम्हाला मधुमेह असू शकतो. ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करुन घ्या. डोळ्यासमोर काळे किंवा तपकिरी डाग दिसणे हे मधुमेह टिनोपॅथीचे लक्षण असू शकतं. ब्लड शूगरचा स्तर डोळ्याचा मागिल भागातील रक्तवाहिनीचं नुकसान करतो. तुम्ही आंधळे होऊ शकता. मधुमेह झाल्यास आरोग्याची काळजी घ्या.
अनेक वेळा डोळ्यासमोर अचानक अंधारी येते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण तुम्हाला माइग्रेन, स्ट्रोक असू शकतो. अगदी ब्रेन ट्यूमरमध्येही तुमच्या डोळ्यापुढे अंधारी येते. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टराकडे जा.
डोळाखाली काळपटपणा आणि डोळ्याला सूज असेल तर याकडे लक्ष द्या. जास्त प्रमाणात सौंदर्य प्रसाधनचा वापर केल्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. तुम्ही जर जेवण्यात मीठ जास्त खात असाल तर शरीरातील पाणी कमी होतं. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. जर तुम्हाला एनीमिया, थायरॉइडचा त्रास असेल तर तुमच्यामध्ये ही लक्षणं दिसून येतात. तसंच हार्मोन्स बदल्यामुळेही तुमच्यामध्ये ही लक्षण आढळून येतात. म्हणून तुमच्यामधील होणाऱ्या बदल्याकडे लक्ष द्या.
डोळ्यातील पांढरा भाग जर पिवळा पडला तर तुम्हाला कावीळ असू शकतो. रक्त वाहिनीला दुखापत झाली तर डोळे लाल होतात. त्यामुळे वेळीच या गोष्टीकडे लक्ष द्या.
जर दीर्घ काळ तुमचे डोळे कोरडे वाटत आहे. डोळ्यात जळजळ होतेय. डोळे दुख आहेत तर अशावेळी तुम्ही डॉक्टरकडे जायला हवं. डोळ्यातून अश्रू कमी झाले आहे किंवा अश्रू लवकर सुकत आहेत. ही लक्षणं औषधांच्या दुष्परिणाम पण असू शकतो. वाढत्या वयामुळेही ही लक्षणं दिसून येतात.
मुळात डोळ्यांची चांगली काळजी घ्यायला हवी. त्यात दिसणाऱ्या बदल्यांकडे कधीही दुर्लक्ष करायला नको. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
इतर बातम्या :