Weight loss and sleep | काय सांगता ? झोपूनही वजन होऊ शकते कमी ?
झोपूनही वेगाने वजन कमी करता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
नवी दिल्ली – सध्याच्या काळात, वाढत्या वजनाच्या समस्येमुळे (weight gain) जवळजवळ प्रत्येकजण त्रस्त आहे. यासाठी बरेच जण विविध पद्धतींचा अवलंब करतात. वजन कमी करण्यासाठी (weight loss) अनेकजण तासनतास जिममध्ये घालवतात. तर काही लोक असेही आहेत जे वजन कमी करण्यासाठी खाणेपिणे सोडतात किंवा डाएट करतात. पण या पद्धती चुकीच्या आहेत, त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम (health problem) होऊ शकतो. शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी योग्य मार्ग अवलंबणे फार महत्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. हे उपाय फॉलो करून तुम्ही झोपूनही वजन कमी करू शकता.
झोपून वजन कमी कसे करावे ?
शरीराचे वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय फॉलो करण्याची गरज आहे. ते जाणून घेऊया.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका
आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जेवल्यानंतर लगेच झोपतात. मात्र यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये. वजन कमी करायचे असेल तर झोपायच्या सुमारे 3 ते 4 तास आधी जेवणे आवश्यक आहे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते. तसेच वजनही झपाट्याने कमी करता येते.
चादर किंवा पांघरूणाशिवाय झोपा
झोपतानाही तुमचे वजन नियंत्रणात राहावे असे वाटत असेल तर त्यासाठी ब्लँकेट आणि चादर न पांघरता झोपणे आवश्यक आहे. खरंतर गरम तापमानाच्या तुलनेत थंड तापमानात तुमचे मेटाबॉलिज्म योग्यरित्या कार्य करते, त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात असते. काही संशोधनातून असे समोर आले आहे की थंड खोलीच्या तापमानामुळे शरीरातील ब्राऊन फॅटचे प्रमाण वाढते. त्याच्या मदतीने तुम्ही शरीरातील अतिरिक्त ब्लड शुगरपासून मुक्त होऊ शकता. तसेच, तुमच्या कॅलरीज जलद बर्न होतात.
झोपण्यापूर्वी प्या ग्रीन टी
वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यावा. ग्रीन टीमध्ये फ्लेवोनोइड्स तत्वं असते, ज्यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही गरम पेय प्यायची सवय असेल तर तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीराचे वजन वेगाने कमी होऊ शकते.
इंटरमिटेंट फास्टिंग
शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करणे खूप प्रभावी आहे. वास्तविक, या फास्टिंगमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखर कमी होते. तसेच चरबी देखील कमी होऊ शकते. म्हणूनच झोपायला जाण्याच्या सुमारे 5 तास आधी काहीही खाण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर केवळ पाणी प्यावे. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.
केसिन प्रोटीन ठरते फायदेशीर
जर तुम्हाला कोणतेही कष्ट न करता तुमचे वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आहारात केसिन प्रोटीनचा समावेश करू शकता. हे एक प्रोटीन आहे जे हळूहळू पचते. तुम्ही झोपण्याच्या 1 तास आधी केसिन प्रोटीन शेक खाल्ल्यास तुमचे मेटाबॉलिज्म वाढते. मेटाबॉलिज्म वाढल्यामुळे शरीर अतिरिक्त कॅलरी जलद बर्न करते, ज्यामुळे वाढते वजन कमी होऊ शकते.
शरीराचे वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. झोपताना काही सोप्या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. पण तुमचे वजन जर झपाट्याने वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)