Abortion : स्वतःच्या अल्पवयीन मुलीसाठी आईच करतेय ‘गर्भनिरोधक’ गोळ्यांचा साठा, जाणून घ्या, काय आहे प्रकरण?

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महिलांना गर्भपाताचे अधिकार देणारे 50 वर्ष जुने ‘रो’ विरुद्ध ‘वेड’ प्रकरण रद्द केले. या निर्णयानंतर महिलांचा गर्भपाताचा अधिकार पुन्हा बेकायदेशीर ठरला आहे. निर्णयानंतर अमेरिकेतील महिला आपल्या अल्पवयीन मुलींसाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा करून ठेवत आहेत.

Abortion : स्वतःच्या अल्पवयीन मुलीसाठी आईच करतेय ‘गर्भनिरोधक’ गोळ्यांचा साठा, जाणून घ्या, काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 1:38 PM

मुंबई : अमेरिकेत सुप्रिम कोर्टाने ‘रो’ व्हर्सेस ‘वेड’ (Roe v. Wade) चा निर्णय रद्द केल्याने, गर्भनिरोधक (Contraceptives), आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे. देशात गर्भपाताशी संबंधित नियम कडक केल्यामुळे महिला आणि कुटुंबांनी या गर्भनिरोधक आणि गर्भपात गोळ्यांचा साठा (Stock of pills) सुरू केला आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या महिला कंन्सल्टींगच्या संख्येत चार पट वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ‘जस्ट द पिल’ या क्लिनिकला एका तासात गर्भनिरोधक गोळ्यांच्या १०० डिमांड ऑर्डर येत आहेत. अमेरिकन केटी थॉमस नावाच्या महिलेचे म्हणणे आहे की, देशात गर्भपात बेकायदेशीर (Abortion is illegal) असल्याचे कळल्यानंतर तिने तिच्या 16 वर्षांच्या मुलीसाठी गर्भनिरोधक गोळ्या विकत घेतल्या आहेत. केटीने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ला सांगितले की, माझ्या मुलीच्या नको असलेल्या गर्भधारणेच्या भीतीने मी या गर्भनिरोधक गोळ्या अगोदरच खरेदी करून ठेवल्या आहेत. मला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल.

तर होईल ब्लॅकने विक्री

दुसरी एक महिला म्हणते की, तिच्या 21 वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या मैत्रिणीला कधी गरज असेल, तर अशा परिस्थितीत मी इमर्जन्सी गर्भनिरोधक ‘प्लॅनिंग-बी’ गोळ्यांचा साठा करायला सुरवात केली आहे. अटलांटामधील नियोजित ‘पेरेंटहूड साउथईस्ट’ या संस्थेच्या प्रवक्त्या लॉरेन फ्रेझियर म्हणतात की, एक महिला किती गोळ्यांचा साठा करू शकते असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. गर्भपात आणि इतर आरोग्य सेवा प्रदात्यांनी महिलांना अशा प्रकारे गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा करू नये असा इशारा दिला आहे. यामुळे गरजूंसाठी आवश्यकता भासल्यास त्याचा तीव्र तुटवडा निर्माण होईल.फक्त काळ्या बाजारात या गोळ्यांची ब्लॅक ने विक्री सुरु होईल.

‘जस्ट द पिल’ने काढले निवेदन

अमेरिकेतील 13 राज्यांनी आधीच नवीन नियम लागू केले आहेत. या राज्यांमध्ये अलाबामा, आर्कान्सा, केंटकी, लुईझियाना, मिसूरी यांचाही समावेश आहे. जस्ट द पिलने आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष देत नाही आणि गरजूंना मदत करत राहू. आम्ही तुमच्यासाठी येथे आहोत. तुम्ही आमच्या सेवा मिनेसोटा, मॉन्टाना, वायोमिंग आणि कोलोरॅडो येथे घेऊ शकता, असे निवेदनात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला

अन्न आणि औषध प्रशासनाने गर्भधारणेच्या पहिल्या 10 आठवड्यात गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेत अजूनही निदर्शने सुरू आहेत. यूएस सुप्रिम कोर्टाने अलीकडेच महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारे 50 वर्ष जुने रो विरुद्ध वेड प्रकरण रद्द केले. या निर्णयानंतर महिलांचा गर्भपाताचा अधिकार पुन्हा बेकायदेशीर ठरला आहे. दरम्यान, प्रत्येक राज्य गर्भपातासाठी स्वतःचे नियम बनविण्यास स्वतंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये विरोध होत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या निर्णयाचा निषेध केला आहे. या निर्णयाचे वर्णन लाखो अमेरिकन लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे त्यांनी सांगीतले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.