या उन्हाळ्यात कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी करा ‘हे’ सर्वोत्तम घरगुती उपाय
उन्हाळ्यात केवळ तेलकट त्वचा असलेल्या लोकांनाच नाही तर कधीकधी कोरडी त्वचा असलेल्या लोकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाचा तडाखा आणि धुळीमुळे कोरडी त्वचा अधिक कोरडी होते. पण त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

उन्हाळ्यात, प्रखर सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि उष्ण वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याचदा लोकांचा असा विश्वास असतो की उन्हाळ्यात फक्त तेलकट त्वचा असलेल्या लोकांनाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु या दिवसांमध्ये तेलकट त्वचासह कोरडी त्वचा असलेल्या लोकांनाही या ऋतूत अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरात ओलावा कमी असणे, जास्त घाम येणे आणि वारंवार चेहरा धुणे यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघुन जातो. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसते.
जर तुमची त्वचा उन्हाळ्यात कोरडी आणि निर्जीव होत असेल, तर तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांवर जास्त खर्च करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमची त्वचा हायड्रेटेड, मऊ आणि चमकदार बनवू शकता. उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवणारे सोपे उपाय कोणते आहेत ते जाणून घ्या.
उन्हाळ्यात कोरडी त्वचा टाळण्यासाठी घरगुती उपाय




नारळाच्या तेलाने मालिश करा
नारळाच्या तेलात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला खोलवर हायड्रेट करतात. आंघोळीपूर्वी नारळाचे तेल थोडे गरम करून चेहऱ्यावर आणि शरीरावर लावल्याने त्वचा मऊ राहते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर नारळाचे तेल लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. दुसऱ्या दिवशी सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे.
कोरफडीच्या जेलपासून आराम मिळवा
कोरफड हे एक नैसर्गिक हायड्रेटर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. ते त्वचेला थंड करते आणि उन्हाळ्यातील उन्हामुळे होणारी सनबर्न आणि कोरडेपणा दूर करते. तुम्ही कोरफड जेल घ्या आणि चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ते 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. दररोज असे केल्याने त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहील.
दूध आणि मधाने त्वचेला मॉइश्चरायझ करा
दुधात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा मऊ आणि गुळगुळीत त्वचा बनवते, तर मध त्वचेला खोलवर हायड्रेशन प्रदान करते. दोन्ही एकत्र लावल्याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. यासाठी 2 चमचे कच्च्या दुधात 1चमचा मध मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे सुकू द्या. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि हलके मॉइश्चरायझर लावा.
दही आणि बेसनाचा फेस पॅक
दही त्वचेला हायड्रेट करण्यासोबतच मऊ आणि चमकदार बनवते. त्याचवेळी बेसन त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचेला फ्रेश ठेवते. 2 चमचे दह्यात 1 चमचा बेसन मिसळून तुम्ही फेस पॅक बनवा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी हलक्या हाताने स्क्रब करा आणि धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करा.
तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ग्लिसरीन घाला
ग्लिसरीन नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते आणि त्वचेला कोरडेपणापासून वाचवते. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिक्स करा. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)