कोरोना लस घेतल्यानंतर त्रास होतो ? वाचा पाच संभाव्य साईड ईफेक्ट्स

कोरोना लसींमुळे शरीरावर साईड ईफेक्ट दिसत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. (side effects corona vaccine)

कोरोना लस घेतल्यानंतर त्रास होतो ? वाचा पाच संभाव्य साईड ईफेक्ट्स
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 5:21 PM

मुंबई : अनेक देशांमध्ये कोरोना महामारीला थोपवण्यासाठी प्रभावी लस शोधण्याचे काम सुरु आहे. तर अमेरिका, ब्रिटेनसारख्या देशांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जवळपास दोन लाख नागरिकांना नावनोंदणीही केली आहे. मात्र, या लसींमुळे शरीरावर अनेक साईड ईफेक्ट होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स तसेच आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. (five possible side effects due to corona vaccine)

अनेक कंपन्यांनी तयार केलेल्या लसीची चाचणी काही स्वयंसेवकांवर करण्यात आली. यावेळी या लसीमुळे स्वयंसेवकांच्या शरीरावर काही साईड ईफेक्ट्स झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे जाणून घेऊयात कोरोना लस घेणाऱ्या लोकांच्या शरिरावर कोणते साईड ईफेक्ट होत आहेत.

ताप आणि थंडी

मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लस टोचल्यानंतर एका स्वयंसेवकाला ताप तसेच अंगात हुडहुडी भरल्याचे आढळून आले. मॉर्डनाची लस घेतल्यानंतर या स्वयंसेवकाच्या अंगात 102 डिग्री सेल्सियसपर्यंत ताप भरल्याचे समोर आले होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कुठलीही लस घेतल्यानंतर अँन्टीबॉडी तयार करत असताना शरीरात ताप भरतोच. मात्र, असे असले तरी कंपनीला आपली लस विकसित करुन ताप आणि थंडीसारखे साईड ईफेक्ट्स कमी कसे होतील याकडे लक्ष द्यावं लागेल. (five possible side effects due to corona vaccine)

डोकेदुखी

कोरोन लस घेतल्यानंतर डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. लस घेतल्यानंतर तीव्र डोकेदुखीसोबत मानसिक तणाव, चिडचिडपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या सर्व समस्यांना सामोरे जाण्यास नागरिकांना स्व:तची मानसिक तयारी करावी लागेल. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यत: कोणत्याही प्रकारची लस घेतल्यांतर डोकेदुखीची समस्या जाणवते.

उल्टी आणि मळमळ

कोरोन लस घेतल्यानंतर शरीरातील ग्रॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकवर परिणाम पडू शकतो. परिणामी लस घेतल्यानंतर उल्टी आणि मळमळ अशा स्वरुपात साईड ईफेक्ट जाणवू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मॉडर्ना लसीची सर्वाधिक मात्रा देण्यासाठी एका स्वयंसेवकाची निवड करण्यात आली होती. या स्वयंसेवकाला ही मात्रा दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. त्याला उल्टी, मळमळ, घबराट अशी लक्षणं दिसली होती. त्यामुळे कोरोना लस घेताना उल्टी आणि मळमळसारखी लक्षणं दिसू शकतात.(five possible side effects due to corona vaccine)

स्नायूदुखी

ज्या ठिकाणी कोरोना लस टोचलेली आहे; त्या ठिकाणी स्नायूमध्ये वेदना जाणवू शकतात. तसेच, लस टोचलेला भाग लाल होणे किंवा वृण उमटण्यासाखे साईड ईफेक्ट होऊ शकतात. मॉर्डना, फायझर आणि ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या लसी टोचल्यानंतर अशा प्रकारच्या समस्या दिसून आलेल्या आहेत.

मायग्रेन

लस घेतल्यानंर मायग्रेन म्हणजेच एका बाजूने डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. एका अहवालानुसार फायझर लस घेणाऱ्या एका स्वयंसेविकेला मायग्रेनची समस्या जाणवली होती. हा त्रास अतिशय तीव्र स्वरुपाचा होता.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात जानेवारीपासून लसीकरण?, आदर पुनावाला यांचे संकेत

कोरोना विषाणू फुफ्फुसांना कसा पोखरतो? वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली

(five possible side effects due to corona vaccine)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.