Health Care : उन्हाळ्यात व्यायाम करत आहात? मग तज्ज्ञांनी सांगितलेले हे नियम नक्कीच फाॅलो करा!
उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळे आपल्याला घाम येतो. त्यामुळे बाहेर जाऊन वेगळा व्यायाम करायचा असेल तर विशेष काळजी घ्यावी लागेल. उन्हाळ्यात व्यायाम करताना विशेष काळजी न घेतल्यास समस्या उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी लक्षात ठेवा. उन्हाळ्यात सैल सुती कपडे घाला. मात्र, व्यायाम करताना असे सुती कपडे धोकादायक ठरू शकतात.
मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये व्यायाम करून वजन कमी करण्यावर अनेकांचा भर असतो. हिवाळ्यात थंडी असल्याने अनेकांना जिममध्ये जाण्याचा आळस येतो. शिवाय, शरीरातील चरबी स्वेटर आणि उबदार कपड्यांखाली झाकली जाते. पण उन्हाळा म्हणजे हलके कपडे आणि शरीर तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात व्यायाम हा केला जातो. नियमित व्यायामामुळे रोग, स्ट्रोक आणि मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे लोक नियमितपणे व्यायाम करतात, ते नेहमीच आजारांपासून चार हात लांब राहतात.
उन्हाळ्यात व्यायामासंदर्भात तज्ज्ञ काय म्हणतात पाहा
उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळे आपल्याला घाम येतो. त्यामुळे बाहेर जाऊन वेगळा व्यायाम करायचा असेल तर विशेष काळजी घ्यावी लागेल. उन्हाळ्यात व्यायाम करताना विशेष काळजी न घेतल्यास समस्या उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी लक्षात ठेवा. उन्हाळ्यात सैल सुती कपडे घाला. मात्र, व्यायाम करताना असे सुती कपडे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सहज हलके आणि घाम शोषेल असे कपडे घालावेत.
दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या
आपण दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. आणि व्यायाम करताना पाण्याची मोठी बाटली सोबत ठेवा. अधूनमधून थोडेसे पाणी प्या. तहान लागेपर्यंत थांबू नका. तहान लागणे म्हणजे शरीराला आधीच पाण्याची गरज भासते. अशा गरजा निर्माण होण्यापूर्वी पूर्ण केल्या पाहिजेत. अन्यथा व्यायामाचा नकारात्मक परिणाम होईल. शिवाय, व्यायाम करताना पाणी न पिल्यास चक्कर येणे, मळमळणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे एक एक सेट केल्यानंतर थोडे थोडे पाणी प्यावे लागेल.
स्पोर्ट्स आणि हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करा
तुम्हाला वर्षभर तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराचे ऐकावे लागेल. कोणत्याही प्रकारचे खेळ, क्रियाकलाप, व्यायाम करताना चक्कर येणे, पाण्याची तीव्र तहान, हात-पायांवर पेटके येणे, तोंड कोरडे होणे या लक्षणांपासून सावध रहा. ताबडतोब व्यायाम करणे किंवा खेळणे थांबवा. सावलीच्या थंड ठिकाणी बसा. स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. तुम्हाला दिसेल की शरीर हळूहळू बरे होत आहे. मात्र, शारीरिक आजार असूनही तुम्ही व्यायाम करत राहिल्यास किंवा खेळणे थांबवले नाही, तर त्यामुळे गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात.