Good habits for weight loss: वजन कमी करायचे असेल तर आजच अवलंबवा ‘या’ चांगल्या सवयी

जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केलेत, तर वजन कमी करून ते सहजपणे नियंत्रणात ठेवू शकता.

Good habits for weight loss: वजन कमी करायचे असेल तर आजच अवलंबवा 'या' चांगल्या सवयी
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 4:53 PM

नवी दिल्ली – तुम्ही वजन कमी करण्याचा (weight loss) प्रयत्न करत आहात पण तुमचा आवडता पदार्थ पाहून तुमचा डाएटचा (diet) संपूर्ण प्लॅन फसला, असं तुमच्यासोबत कधी झालं आहे का? अनेक लोकांसोबत असं बऱ्याच वेळेस घडतं आणि त्यांना या चुकीबद्दल पश्चात्तापही करावा लागतो काही लोक कठोरपणे डाएट करून वजन कमी करतातही , पण ते नियंत्रणात ठेवणे सगळ्यांनाच जमतं असं नाही. पण तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केलेत, तर वजन कमी झाल्यानंतर तुम्ही ते सहजपणे नियंत्रणात (maintain weight) ठेवू शकता.

कठोर मेहनतीशिवाय वजन कमी करण्याचे मार्ग

हे सुद्धा वाचा

1) हायड्रेटेड रहा

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारातील कॅलरीचं प्रमाण कमी करावं लागेल. कॅलरी कमी करण्यासाठी, जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. अथवा तुम्ही द्रव पदार्थांचे सेवनही वाढवू शकता. पाणी अथवा इतर द्रव पदार्थांमध्ये कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त प्या.

2) शारीरिक हालचाल महत्वाची

वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला कॅलरीचे प्रमाण कमी करण्यासोबतच शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणेही आवश्यक आहे. दिवसभरात एक तास व्यायाम करणे शक्य नसेल पण याचा अर्थ दिवसभर बसूनच रहावे असे नाही. दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून राहिले तर वजन कमी करण्यात यश मिळेल.

3) घरी अन्न शिजवण्याचा प्रयत्न करा घरी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यामुळे आपल्याला जेवणातील कॅलरीचे प्रमाण कमी ठेवणे शक्य होते व वजन घटवण्यात त्याची मदत होते. तुम्ही जेव्हा घरी स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही कोणता पदार्थ अधिक वापरताय, तुमच्यासाठी काय योग्य आहे, याची तुम्हाला माहिती असते. घरी अन्न शिजवताना निरोगी गोष्टींचा वापर केला जातो, ज्यामुळे आपल्याला वजन टिकवून ठेवण्यास मदत होते.

4) जेवण करणे टाळू नका

वजन कमी करयचे म्हणून कधीच जेवण किंवा अन्नपदार्थ खाणे टाळू नका. अन्न खाणे टाळल्यास आपल्या शरीरात पोषक कमतरता निर्माण होते. तसेच नाष्टा करणेही टाळू नका , त्यामुळे तुम्हाला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

5) काय खाता याची घ्या काळजी

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर किती खाता याप्रमाणेच तुम्ही काय खाता याचीही काळजी घेणे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य वजन हवे असेल तर तुम्ही किती खाताय याकडे लक्ष द्यावे. गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन केल्यास तुमचे वजन वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. तसेच इतर आजारही होऊ शकतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.