नवी दिल्ली – नवं वर्ष सुरू होऊन काही दिवस झाले असले तरी बरेच लोकं अजूनही नव्या वर्षाचे (new year celebration) स्वागत करत अनेक संकल्प करत आहेत. त्यातील सर्वात वरचा क्रमांक आहे वजन कमी करण्याच्या संकल्पाचा. वाढते वजन नियंत्रणात (weight control) ठेवणे फार सोपे नाही. त्यासाठी अनेक लोक डाएटिंग आणि वर्कआऊट (diet and workout) करण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टरही वजनवाढ रोखण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात. मात्र बरेच लोक वजन कमी करण्यासाठी सोप्या टिप्स शोधत असतात. जर तुम्हालाही 2023 या वर्षात वेगाने वजन कमी करायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
– लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्यधनसंपदा लाभे ही म्हण आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेलच. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर या म्हणीप्रमाणे वागा. यामुळे वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होईल. त्यासाठी रोज रात्री 9 वाजता झोपावे आणि सकाळी 5 वाजता उठावे. जर हे शक्य नसेल तर रात्री 10 ते 11 दरम्यान नक्की झोपावे आणि सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान उठावे. सकाळी उठल्यानंतर व्यायाम आणि योगासने करावीत.
– 2023 या नववर्षात वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी 15 मिनिटे तरी व्यायाम जरूर करा. जर तुम्हाला बाहेर किंवा पार्कमध्ये चालायला जमत नसेल तर तुम्ही घरातल्या घरात दोरीच्या उड्या मारणे, ब्रिस्क वॉकिंग आणि सायकलिंग करू शकता. यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळू शकेल.
– दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. डॉक्टरही चांगल्या आरोग्यासाठी रोज 3 लिटर पाणी प्यायचा सल्ला देतात. यासाठीच 2023 या वर्षात कमीत कमी 3 लिटर पाणी आवर्जून पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहील.
– जर तुम्हाला वाढते वजन सहज नियंत्रणात ठेवायचे असेल तर रोज संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी रात्रीचे जेवण करावे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर रात्री 7 नंतर काहीही खाऊ नये.
– तणावापासून दूर रहावे. 2023 या वर्षात मानसिक व शारीरिक आजारांपासून बचाव करायचा असेल तर ताण-तणावापासून दूर रहावे. ताण घेतल्याने अधिक भूक लागते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तणावग्रस्त व्यक्ती अधिक अन्न खाते. त्यामुळेच वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तणावापासून दूर रहा.