परीक्षेदरम्यान डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ खास टिप्स

डिजिटल उपकरणं दीर्घ काळ वापरणं, पुस्तकं वाचणं, वाचन आणि परीक्षेचे दडपण यामुळे शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सहसा विचारात घेतल्या न जाणाऱ्या 'डोळे' या अवयवाला प्रचंड थकवा येतो. (Follow these special tips to keep your eyes healthy and take care of your eyes during the exam)

परीक्षेदरम्यान डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 5:30 PM

मुंबई : काही राज्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात विविध सेमिस्टर आणि स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत, तसेच परीक्षांसाठी जोरदार तयारी करत आहेत. डिजिटल उपकरणं दीर्घ काळ वापरणं, पुस्तकं वाचणं, वाचन आणि परीक्षेचे दडपण यामुळे शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सहसा विचारात घेतल्या न जाणाऱ्या ‘डोळे’ या अवयवाला प्रचंड थकवा येतो.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय नेहमी करणे आवश्यक

हैदराबादमधील मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटलमधील फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. वामशीधर हे परीक्षेच्या आधीच्या दिवसांमध्ये डोळ्यावर ताण आल्याची तक्रार अनेकदा करणाऱ्या रुग्णांशी नियमितपणे संवाद साधतात. डोळे निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असलेले उपाय नेहमी करणे आवश्यक आहे.

फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. वामशीधर यांच्या मते, “डोळ्यांची योग्य निगा राखत असताना, तुम्हाला अनेक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. डोळ्यांचे कार्य सुरळीत राखण्याच्या दृष्टीनं करायचे व्यायाम आणि विविध टप्पे याचे गांभीर्य फार कमी जणांना असते.”

अनेकांना होणारे डोळ्यांचे त्रास बरे करण्यासाठी पुढे काही महत्त्वाचे उपाय दिले आहेत

  1. जास्त वेळ कॉम्प्युटर वापरल्याने अनेकदा डोळ्यांना थकवा जाणवतो. डोळे कमी वेळा उघड-बंद न केल्यास डोळ्यांतले ल्युब्रिकेशन कमी होते आणि त्यामुळे डोळे अधिक थकलेले, कोरडे होतात.

उपाय: वाचन करताना डोळ्यांपासून किमान 25 सेमीचे अंतर राखणं गरजेचं आहे. अनेक तास वाचन करत असताना मध्ये पुरेशी विश्रांती (5 ते 10 मिनिटं) घ्यावी. 5 मीटर अंतरावर असलेल्या लांबच्या वस्तूंवर नजर टाकल्यासही डोळ्यांना आराम मिळू शकतो.

2. पुरेशी झोप न झाल्यानं डोळे कोरडे होतात, यामुळेही डोळ्यांची जळजळ होते. संसर्ग होण्याचे व अस्वस्थपणा येण्याचे हे आढळणारे कारण आहे.

उपाय: डोळे ताजेतवाने ठेवण्यासाठी डोळे चोळणे टाळा. डोळ्यांवर गार पाणी मारल्यास डोळे ताजे राहतात व ओलावा टिकून राहतो. कृत्रिम अश्रू किंवा आयड्रॉप किंवा ल्युब्रिकेशन यासारखे पर्याय वापरल्यास डोळ्यांतला नैसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी मदत होते.

3. काँटॅक्ट लेन्स वापरल्याने झोप अपुरी होणे, हा सर्रास आढळणारा आणखी एक प्रश्न आहे. अनेक तास काँटॅक्स लेन्स घालून ठेवल्यास डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. यामुळेही डोळ्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.

उपाय: अशा स्थितीमध्ये, चष्मा वापरावा आणि लेन्स आणि चष्मा असा दोन्हीचा आळीपाळीने वापर करावा. विद्यार्थ्यांनी सिलिकॉन हायड्रोजनपासून बनवलेल्या चांगल्या गुणवत्तेच्या काँटॅक्ट लेन्सचा वापर करावा. ऑक्सिजन खेळता राहण्याची प्रक्रिया सुधारित असणारे हे नवे साहित्य आहे. यामुळे अस्वस्थ वाटण्याचे प्रमाण बरेच कमी होते. आकडेवारीनुसार, अपुरी झोप झाल्याने किंवा भरपूर अभ्यास केल्यानं परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 5-10% शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो किंवा डोळ्यांना थकवा जाणवतो.

Eye Care

काही खास टिप्स

1. तुम्हाला चष्मा असेल तर अभ्यास करत असताना नेहमी चष्मा वापरायला हवा.

2. तुम्ही काँटॅक्ट लेन्स वापरत असाल तर दररोज 10-12 तासांपेक्षा जास्त वेळ लेन्स घालू नका.

3. टीव्ही बघणे किंवा मोबाइल गेम खेळणे टाळा.

4. 20-20-20 या नियमाचा सराव करा. 20 मिनिटं वाचन केल्यानंतर डोळे 20 सेकंद बंद करा आणि त्यानंतर 20 फूट इतक्या अंतरावर पाहा. यामुळे डोळ्यांवरचा ताण बराच कमी होईल.

5. ल्युब्रिकंट आयड्रॉप नेहमी किंवा गरजेनुसार वापरा.

साधारणपणे घ्यायची काळजी आणि बाळगायची सावधगिरी:

  • अभ्यास करत असताना योग्य स्थितीमध्ये बसा. कधीही पाठीवर झोपून वाचन करू नका.
  •  डोळे आणि स्क्रीनची खालची बाजू यांच्यामध्ये 45 अंशाचा कोन असणे, ही आदर्श स्थिती आहे.
  •  कॉम्प्युटर टर्मिनलसारख्या परावर्तित करणाऱ्या पृष्ठभागांवर काम करत असताना, ग्लेअर व डोळ्यावरील ताण कमी करण्यासाठी अँटि-रिफ्लेक्शन कोटेड ग्लासेसचा वापर करा.
  •  मंद प्रकाशयोजना असलेल्या ठिकाणी वाचन करणे कटाक्षाने टाळावे, अन्यथा डोळ्यांवर आणखी ताण येतो. चालती बस, ट्रेन किंवा कार यामध्येही वाचन करणे टाळावे.
  •  परीक्षेदरम्यान वेळापत्रक बदलत असल्याने त्यानुसार आहारामध्ये चांगले बदल करणे महत्त्वाचे आहे. गाजर, पपई, पालक अशा भाज्यांचे व फळांचे सेवन अधिक करायला हवे. या अन्नामध्ये बिटा-कॅरोटिनचे प्रमाण अधिक असते आणि ते दृष्टी निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे असते.
  •  डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे.
  • डोळ्यांची नियमित तपासणी
  • डोळ्यांना काहीही त्रास होत नसला तरी वर्षातून एकदा ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करून घ्या.

मॅक्सिव्हिजन सुपर स्पेशल्टी ही नेत्र रुग्णालयांची साखळी परीक्षेच्या कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करते. सतत डोके दुखणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे आणि डोळ्यांमध्ये सतत वेदना होणे, अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने त्यांच्या पाल्याला नेत्रतज्ज्ञांकडे न्यावे आणि संपूर्ण नेत्रतपासणी करून घ्यावी, असे मॅक्सिव्हिजनचे मत आहे.

        डॉ. वामशीधर, फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल

संबंधित बातम्या

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, सक्रिय रुग्णसंख्या 4.1 लाखांवर

कोरोना काळात लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या औषधी वनस्पती आणि मसाले वापरा!

Health Care : चहाच्या ‘या’ फायद्यांविषयी तुम्हाला कदाचित माहिती नसेल, वाचा सविस्तर! 

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.