Health | पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा!
अनेकांना सी फूड खायला प्रचंड आवडतो. मात्र, पावसाळ्यामध्ये सी फूडचे सेवन टाळावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचा धोका असतो. यामुळे, मासे किंवा इतर सीफूड सहजपणे संक्रमित होतात. त्यामुळे पावसाळ्यात सीफूड खाणे टाळावे. जर आपण सतत सी फूड खाल्ले तर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
मुंबई : पावसाळ्याच्या (Rainy season) हंगामात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या हंगामात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या समस्येसोबतच अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते. पाऊस एकटाच येत नाही तर अनेक रोग देखील आपल्यासोबत घेऊन येतो. या ऋतूत थोडीसा निष्काळजीपणा (Negligence) तुम्हाला आजारी बनवू शकतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागते, त्यामुळे आजारही होऊ शकतात. या ऋतूत आपण आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करतो, हे अत्यंत महत्वाचे आहे. शक्यतो पावसाळ्याच्या हंगामात बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. घरी तयार केलेले निरोगी आणि ताजेच अन्न (Fresh food) खाण्यावर भर द्या. यामुळे आपण पावसाळ्यामध्येही निरोगी राहू शकतो.
सी फूड खाणे टाळा
अनेकांना सी फूड खायला प्रचंड आवडतो. मात्र, पावसाळ्यामध्ये सी फूडचे सेवन टाळावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याचा धोका असतो. यामुळे, मासे किंवा इतर सीफूड सहजपणे संक्रमित होतात. त्यामुळे पावसाळ्यात सीफूड खाणे टाळावे. जर आपण सतत सी फूड खाल्ले तर आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
कच्चे अन्न खाणे टाळा
बऱ्याच वेळा गडबडीत आपण अन्न पूर्ण शिजू देत नाहीत. मात्र, या हंगामात असे अजिबात करू नका. यामुळे पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कच्च्या अन्नामुळे हानिकारक जीवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. याशिवाय या ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म खूप मंद गतीने काम करते. अशा स्थितीत अन्न पचायला बराच वेळ लागतो.
स्ट्रीट फूड टाळा
स्ट्रीट फूड कोणाला आवडत नाही, पण पावसाळ्यात स्ट्रीट फूडचे सेवन टाळावे. स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे आजार होऊ शकतात. यामुळेच पावसाळ्यात स्ट्रीट फूडपासून दूर राहावे किंवा बाहेरचे अन्न कमी प्रमाणात खा. या हंगामात तेलकट पदार्थ पण खाणे टाळाच.
हे अत्यंत महत्वाचे
हंगाम कोणताही असो नेहमीच हिरव्या पालेभाज्या आणि फळे हे धुवून घ्यायलाच हवीत. विशेषत: पावसाळ्यात काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात अनेकदा पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया मुबलक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत, अन्न खाण्यापूर्वी ते योग्यरित्या धुणे खूप महत्वाचे आहे. फळे आणि भाज्या खरेदी करताना काळजी घ्या. कारण पालेभाज्यांमधूनच आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया जाण्याची शक्यता असते.