Health Care Tips | पपईचे सेवन केल्यानंतर या गोष्टी नक्कीच पाळा, नाही तर होऊ शकते मोठे नुकसान
अनेक वेळा लोक निरोगी किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करतात. मात्र, यामुळे बऱ्याचदा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. दही आणि पपईच्या बाबतीतही तेच आहे. या दोघांचे मिश्रण हानिकारक ठरू शकते. पपई बरोबर खाऊ नये किंवा पपई खाल्ल्यानंतर अर्धा तास दही खाऊ नये.
मुंबई : पपई हे असे फळ (Fruit) आहे, जे जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडते. विशेष म्हणजे बाजारामध्येही पपई सहज मिळते. पपईमध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट वाढवण्याची क्षमता आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त त्यात फायबर, कॅरोटीन, व्हिटॅमिन ई, ए आणि इतर अनेक खनिजे असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर (Beneficial) मानले जातात. व्हिटॅमिन ए (Vitamin) डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते आणि पपई हे त्याचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जाते. पपईमध्ये पपेन नावाचा पदार्थ असतो, जो पचन सुधारतो आणि पोट निरोगी ठेवतो. विशेष म्हणजे आपण पपईची सेवन करून वाढलेले वजनही कमी करू शकतो. पपई आपल्याला वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करते.
पपईसोबत इतर फळांचे सेवन नको
तज्ज्ञांच्या मते, पपईबरोबर किंवा काही काळानंतरही इतर कोणत्याही फळाचे सेवन करू नये. यासाठीही अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे. असे मानले जाते की ते पोटात काही प्रकारची रासायनिक प्रतिक्रिया करू शकतात. यामुळे पपई खाताना नेहमीच काळजी घ्या. पपई खाल्यावर थोड्यावेळ पाणी पिणेही टाळलेले अधिक फायदेशीर ठरेल.
निरोगी किंवा तंदुरुस्त राहणे महत्वाचे
अनेक वेळा लोक निरोगी किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करतात. मात्र, यामुळे बऱ्याचदा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. दही आणि पपईच्या बाबतीतही तेच आहे. या दोघांचे मिश्रण हानिकारक ठरू शकते. पपई बरोबर खाऊ नये किंवा पपई खाल्ल्यानंतर अर्धा तास दही खाऊ नये. असे म्हटले जाते की या दोघांचा प्रभाव वेगळा आहे.
पपईसोबत लिंबाचे सेवन नको
पपईसोबत लिंबाचे सेवन करत असाल तर आतापासून ही सवय सोडा. तुमची ही चूक तुम्हाला अॅनिमियाचा रुग्ण बनवू शकते. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत अॅनिमिया होऊ शकतो, कारण हे अन्न मिश्रण शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी खराब करू शकते. जर तुम्ही सॅलडमध्ये पपई खात असाल तर त्यात लिंबाचा रस अजिबात घालू नका.
या घटकासोबत पपईचे सेवन नको
बऱ्याच लोकांनी कोणत्याही फळासोबत साखरेचे सेवन करायलाही आवडते. यासाठी अनेकजण पपईमध्ये साखर मिक्स करून खातात. मात्र, असे अजिबात करू नका. ही आपली सवय अत्यंत चुकीची आहे. आपण जर पपईमध्ये साखर मिक्स करून खाल्लीतर आपले वजन झपाट्याने वाढू शकते, यामुळेच हे टाळाच.