सावधान! कोरोनामधून बरे झालेल्यांना डेंग्यू आणि फ्लूचा धोका वाढला, वाचा सविस्तर!
कोरोनाव्हायरस महामारीच्या काळात फ्लू आणि डेंग्यूच्या केस देशात झपाट्याने वाढत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाची लागण झालेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे फ्लू आणि डेंग्यूचा धोका वाढला आहे. जे कोरोनामधून बरे झाले आहेत त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
मुंबई : कोरोनाव्हायरस महामारीच्या काळात फ्लू आणि डेंग्यूच्या केस देशात झपाट्याने वाढत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोनाची लागण झालेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे फ्लू आणि डेंग्यूचा धोका वाढला आहे. जे कोरोनामधून बरे झाले आहेत त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.
एम्स, क्रिटिकल केअर विभागाचे डॉ.युद्धवीर सिंह म्हणतात की, सुरुवातीची लक्षणे रूग्णांमध्ये सामान्य दिसतात आणि नंतर अचानक खूप गंभीर स्थिती बनते. डेंग्यू आणि फ्लूच्या केस वाढत आहेत. कारण कोरोना नंतर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. यामुळे ते सहजपणे या आजारांना बळी पडत आहेत. मुले, तरुण आणि वृद्ध सर्व या सर्वांना हंगामी रोगांची लागण लागत आहे. अशा परिस्थितीत काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपल्याला डेंग्यू किंवा फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.
कोरोनामधून बरे झालेल्यांनी अधिक काळजी घ्यावी
डॉ. युद्धवीर यांनी सांगितले की, जे कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. जर अशा लोकांना डेंग्यू किंवा फ्लू झाला तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. वरिष्ठ डॉक्टर विजय कुमार म्हणतात की डेंग्यू टाळण्यासाठी तुम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवून डासांना सहज दूर ठेवू शकता. डास स्थिर पाण्यात प्रजनन करू शकतात आणि यामुळे डेंग्यू देखील पसरू शकतो. भांड्यांमध्ये साठवलेले पाणी नियमितपणे बदला जे जास्त काळ वापरू नका.
डेंग्यूची लक्षणे
-अचानक ताप येणे
-डोकेदुखी
-डोळ्यांच्या मागे वेदना
-स्नायू आणि सांधेदुखी
-चव कमी होणे आणि भूक न लागणे
-छातीवर आणि अंगावर पुरळ येणे
-चक्कर येणे
-उलट्या
फ्लूची लक्षणे
-सर्दी
-घसा खवखवणे
-खोकला
-शिंकणे
-ताप
संबंधित बातम्या :
Health Tips : डायबिटीजच्या रुग्णांनो शुगर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा!
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घसरण
(Follow these tips to prevent dengue and flu)