Vegetables | या 3 भाज्या अधिक पौष्टिक बनवण्यासाठी ही खास ट्रिक फॉलो करा!
पालक आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर भाजी आहे. पालकाचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. त्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक द्रव्ये शिजवल्यावर सहज शोषली जातात. पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते. हे लोह आणि कॅल्शियमचे शोषण प्रतिबंधित करते. ते शिजवल्यावर कॅल्शियम बाहेर पडते.
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी (Health) आणि शरीरासाठी किती महत्वाच्या आहेत. कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात. मात्र, काही भाज्या शिजवल्यानंतर अधिक पौष्टिक होतात. बरेच लोक वजन कमी (Weight loss) करण्यासाठी भाजी, भात आणि चपातीचे सेवन बंद करतात. परंतू ही एक मोठी चूक आहे. आपण जरी वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तरीही भाज्या खाणे कधीच बंद करू नका. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्या शरीराला भरपूर पोषक घटक मिळतात. आपण भाज्यांचे सूप देखील आहारामध्ये घेऊ शकता. बटाटा सोडला तर कधीच कोणत्याच भाजीमुळे आपले वजन वाढत नाही. यामुळे आपल्या आहारामध्ये (Diet) जास्तीत-जास्त भाज्यांचा नक्कीच समावेश करा.
पालक
पालक आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर भाजी आहे. पालकाचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. त्यात खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक द्रव्ये शिजवल्यावर सहज शोषली जातात. पालकामध्ये ऑक्सॅलिक अॅसिड असते. हे लोह आणि कॅल्शियमचे शोषण प्रतिबंधित करते. ते शिजवल्यावर कॅल्शियम बाहेर पडते. शरीर गरजेनुसार ते शोषून घेते. तसेच पालकाजा सूप आहारात घेतल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते.
मशरूम
मशरूमचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करून आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो. मशरूम अनेकदा कच्चे खाल्ले जाते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट अॅगॅथिओनाइनचे प्रमाण जास्त असते. हे अँटीऑक्सिडंट शिजवल्यावर बाहेर पडतं. हे अँटिऑक्सिडंट्स आपल्या पेशींना हानी पोहोचवणारी रसायने काढून टाकतात. यामुळे आपण मशरूम कच्चे किंवा शिजलेले दोन्ही खाऊ शकतो.
शतावरी
शतावरी ही एक आैषधी वनस्पती आहे, जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. शतावरीमध्ये काही पेशी असतात. काही आवश्यक पोषक घटक या पेशींमध्ये अडकतात. अशा परिस्थितीत जेव्हा ही भाजी शिजवली जाते तेव्हा या पेशी तुटतात आणि जीवनसत्त्वे A, B9, C आणि E इत्यादी पोषक तत्व बाहेर पडतात. हे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्यास मदत करते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये शतावरीचा नक्कीच समावेश करा.