मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात टाळाव्यात ‘या’ चुका
हिवाळ्यात आरोग्याची खूप काळजी घेण्याची गरज आहे. यातही तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला काळजी घ्यायला हवी. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूत साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आपण हिवाळा असल्याने काहीही खातो, पथ्य पाळत नाही, पण हे अंगलट येऊ शकतं. कारण, हिवाळ्यात खानपानाची पद्धत बदलते. याविषयी जाणून घेऊया.
गुलाबी थंडी म्हटलं की आपण काहीही खातो. पण, तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूत साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आपण हिवाळा असल्याने काहीही खातो, पथ्य पाळत नाही, पण हे अंगलट येऊ शकतं. कारण, हिवाळ्यात खानपानाची पद्धत बदलते. ICMR च्या म्हणण्यानुसार, भारतात मधुमेहाचे 10 कोटींहून अधिक रुग्ण आहेत. दरवर्षी या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णाने अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते, अन्यथा तब्येत बिघडू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या ऋतूत मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? तज्ञांकडून याविषयी जाणून घ्या.
दिल्लीतील सीनियर फिजिशियन डॉ. कमलजीत सिंह सांगतात की, हिवाळ्यात जेवणाची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. आपली लालसा नियंत्रणात ठेवा. मिठाई आणि फास्ट फूड टाळा. केळीसारखी फळे खाणे टाळा. रात्री जास्त खाऊ नये आणि ऋतूनुसार आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.
मधुमेहाच्या रुग्णांनी जड आहार घेणे टाळावे आणि बटाट्यापासून बनवलेल्या गोष्टी ही टाळाव्यात, असा सल्ला दिला जातो.
व्यायाम सोडू नका
मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्याही प्रकारचा व्यायाम करणे आवश्यक असते, परंतु हिवाळ्यात काही लोक व्यायाम टाळतात असे दिसून येते, असे डॉ. सिंग सांगतात. याचा थेट परिणाम चयापचयावर होऊ शकतो.
व्यायाम न केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. अशा तऱ्हेने मधुमेहाच्या रुग्णांना हिवाळ्यात व्यायाम बंद न करण्याचा सल्ला दिला जातो. रोज 1 ते 2 किलोमीटर चाललो तरी शरीर सक्रिय ठेवा.
औषधे वेळेवर घ्या
मधुमेहाच्या रुग्णांनी आपली औषधे वेळेवर घ्यावीत. कोणत्याही दिवशी औषध घेणं टाळू नका. जर चूक केली तर यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. दोन दिवसांतून एकदा साखरेची पातळी तपासणे देखील महत्वाचे आहे.
दैनंदिन आहाराचे नियोजन
आपल्या दैनंदिन आहाराचे नियोजन अशा प्रकारे करा की आपण कोणत्याही स्वरूपात जास्त गोड खाणार नाही. तसेच बटाटे, पांढरा तांदूळ, पीठ आणि केळी सारखी फळे टाळा.
हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णाने अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे वरील बाबी पाळा. औषधे वेळेत घ्या आणि मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवा. या ऋतूत मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, यासाठी वरील माहितीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. पण, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.