Health Tips : रात्री झोप लागत नाही? ‘या’ पाच गोष्टींचा आहारात समावेश करा आणि फरक अनुभवा…
Health tips : अनेकदा रात्री आपल्याला झोप लागत नाही. अनेकांनी ही समस्या भेडसावते. यावर काही उपाय केल्यास तुम्हाला चांगली झोप लागू शकते. घरातीलच काही पदार्थ खाल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते.
मुंबई : अनेकदा रात्री आपल्याला झोप लागत नाही. अनेकांनी ही समस्या भेडसावते. त्यामुळे रात्री जागरण होतं आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अनेकदा आपण आजारी पडतो. व्यस्थित झोप घेतली की हृदयरोग, मधुमेह आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो . आपण सकस आहार घेणं आणि रात्री चांगली झोप घेणं उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. यावर काही उपाय केल्यास तुम्हाला चांगली झोप लागू शकते. घरातीलच काही पदार्थ खाल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते. मनुके (Raisins), दूध (milk), केळी (banana), बदाम (almonds), गवती चहा (herbal tea) या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा आमि फरक अनुभवा.
मनुके
मनुक्यांमुळे चांगली झोप येण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन बी 6, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहेत. ते मेलाटोनिनच्या उत्पादनात मदत करतात. मनुक्यांमुळे आपल्या शरिरात चांगल्या प्रकारचे हार्मोन तयार होतात. जे झोपेला प्रोत्साहन देतात. झोपण्याच्या 30 मिनिटे आधी तुम्ही मनुके खाऊ शकता. तुम्ही ते तुमच्या रात्रीच्या जेवणात समाविष्ट करू शकता किंवा ते एका ग्लास कोमट दुधासोबत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते.
दूध
आयुर्वेदानुसार एक कप कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. रात्री चांगली झोप येण्यासाठी एक ग्लास कोमट दूध प्या. गरम दुधात चिमूटभर जायफळ, हळद किंवा अश्वगंधा पावडर टाकू शकता. यामुळे तुमची झोपेची समस्या दूर होऊ शकते.
केळी
आयुर्वेदानुसार, रात्री केळीचे सेवन करणं फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी6 शरीराच्या स्नायूंना आराम देण्याचे काम करतात. त्यामुळे झोप येण्यास मदत होते.
बदाम
रात्री चांगली झोप येण्यासाठी बदाम खाणं आवश्यक आहे. बदामामध्ये मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन असतं. यामुळे स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. बदाम तुम्ही दूध किंवा केळीसोबतही घेऊ शकता.
गवती चहा तुम्ही गवती चहा घेऊ शकता.यामुळे शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते आणि चांगली झोप लागते. तुम्ही गवती चहाचे सेवन करू शकता. त्यात एपिजेनिन नावाचे फ्लेव्होनॉइड असते. त्यामुळे झोप लागण्यास मदत होते. हे आपल्या मनाला आणि शरीराला विश्रांती देते. चांगल्या झोपेसाठी तुम्ही गवती चहाचं सेवन करू शकता.
संबंधित बातम्या