Healthy Diet| निरोगी आरोग्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश अवश्य करा,आजारपण कायमचे पळून जाईल !
आपल्याला नेहमी सकस आहार खाण्याचे, तेलकट, तुपट पदार्थ न खाण्याचे व कॅलरी नियंत्रण करण्याचे सल्ले दिले जातात. निरोगी आरोग्यासाठी आपल्याला आहारात काही पदार्थांचा अवश्य समावेश करायला हवा.
उत्तम आरोग्यासाठी एक चांगली जीवनशैली(Lifestyle) , पुरेसा व्यायाम आणि भरपूर सकस आहार(Diet) असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकजण पॅकिंग केलेले, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खात असतात. या पदार्थांमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. आपल्याला आपले आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर अशावेळी आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश आपल्याला करायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे फलेर, पालेभाजी, सुकामेवा,भरपूर व्हिटॅमिन असलेले पदार्थ, मिनरल्स यांचा देखील समावेश करायला हवा. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर आपल्याला कोणतेही आजार भविष्यात होणार नाही. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनविण्यासाठी अनेक पदार्थ लाभदायक भूमिका बजावतात. अंडी, एवोकेडो, दही आणि सुकामेवा या पदार्थांच्या आधारे आपण आपले आरोग्य (Health Diet) चांगले राखू शकतो. या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषकतत्व उपलब्ध असतात, त्याचबरोबर आपल्या शरीरातील अशक्तपणा, थकवा दूर करण्यासाठी हे पदार्थ अत्यंत उपयुक्त ठरतात.
एवोकेडो
एवोकेडो मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मिनरल चे प्रमाण जास्त असतात त्यामुळे आपल्या शरीरातील हाडांचे आरोग्य चांगले राहते. जर तुमचे वजन कमी झाले असेल तर अशावेळी आहारामध्ये एवोकेडोचा आवश्य समावेश करा कारण की हा पदार्थ खाल्ल्याने आपले वजन काही दिवसांमध्येच वाढेल. दिवसभरातून अर्धा एवोकेडो खाल्ल्याने 18 टक्के व्हिटॅमिन शरीराला प्राप्त होतात.
दही
आपल्या दैनंदिन आहारामध्ये दही चा समावेश अवश्य करायला हवा. दही मध्ये कमी कॅलरी असतात. दही मध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाण कमी असते अशा व्यक्तींना हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात. आपल्या आहारामध्ये दही चा समावेश केल्याने आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते. आपले हृदय देखील स्वस्थ राहते. आपल्या आरोग्याशी संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी दिवसभरातून एकदा दही आवश्यक खायला पाहिजे. चवीसाठी तुम्ही दहीमध्ये मीठ किंवा साखर देखील मिसळू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाल्ल्याने आपल्याला उष्णतेच्या त्रासापासून संरक्षण मिळते.
अंडे
आहारशास्त्र मध्ये नियमितपणे अंडी खाणे अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. तुम्ही अंड्याचा उपयोग नाश्त्यामध्ये देखील करू शकता. अंड्याचे नियमित सेवन केल्याने हृदयरोग ,हृदयविकाराचा झटका व अन्य आरोग्य संदर्भातील समस्या दूर होतात. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात.
सुका मेवा
जर तुम्हाला दिवसभरातून काही नाही काही खाण्याची सवय असेल तर अशावेळी शरीरासाठी घातक ठरणारे पदार्थ न खाता नेहमी तुम्ही सुकामेवा खायला हवा. आपल्या आहारामध्ये सुकामेवा चा नक्की समावेश करायला पाहिजे. आपण जर दिवसभरातून सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, पिस्ता, मनुके,अंजीर यासारखे पदार्थ खाल्ले तर यामुळे शरीराला पोषक तत्वे देखील प्राप्त होतात. यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जास्त असतात त्यामुळे तुम्हाला भूक देखील लवकर लागत नाही. या पदार्थांमुळे आपले पोट नेहमी भरलेले राहते परिणामी लठ्ठपणा, वजन देखील वाढत नाही. सुकामेवा मध्ये प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण जास्त असते यामुळे तुमचे हृदय नेहमी निरोगी राहते.
मसुरची डाळ
मसूर डाळी मध्ये व्हिटॅमिन बी,पोटॅशियम ,झिंक आणि मॅग्नेशियम या सारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये या डाळींचा समावेश अवश्य करू शकता. या डाळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते म्हणूनच ज्या व्यक्तींचे पोट साफ होत नाही, बद्धकोष्टतेचा आजार आहे ,अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये नेहमी मसूर च्या डाळीचा समावेश करायला हवा. डाळीमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. जे लोक मांसाहार सेवन करत नाहीत म्हणजे शाकाहारी लोकांसाठी मसुरची डाळ खूपच लाभदायक मानली जाते.
टिप्स: ही सर्व साधारणपणे सांगण्यात आलेली माहिती आहे. टीव्ही9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही. शरीरात काही समस्या उद्भवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.