Heart Attack | 4 वर्षीय बालकाला आला ह्रदय विकाराचा झटका!, तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसली तर, वेळीच व्हा सावध!

जन्मजात हदयरोग : नुकतेच एका चार वर्षीय बालकास जन्मापासूनच हृदयाशी संबंधित दोन आजार आढळून आले. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. मात्र, त्याला ह्रदय विकाराचा झटका आला. त्याच्या हृदयात छिद्र होते, ज्याला वैद्यकीय भाषेत अॅट्रियल सेप्टल दोष असे म्हणतात. जाणून घ्या, एएसडी असलेल्या मुलांची लक्षणे आणि कारणे याबाबत सविस्तर माहिती.

Heart Attack | 4 वर्षीय बालकाला आला ह्रदय विकाराचा झटका!, तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसली तर, वेळीच व्हा सावध!
4 वर्षीय बालकाला आला ह्रदय विकाराचा झटका!Image Credit source: unisef
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 5:07 PM

आजकाल हृदयाशी संबंधित समस्या सामान्य झाल्या आहेत. तरुण वयात हृदय विकाराचा झटका (Heart attack), पक्षाघात, हृदयक्रिया बंद पडणे आदी गंभीर हृदयविकारांना सामोरे जावे लागत आहे. नुकतेच अमेरिकेतील अशी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे वैद्यकीय विश्वात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील मिशिगनमध्ये एका बाळाचा जन्म झाला. ज्याचे नाव मॅक्स वीगेल (Max Weigel) होते. त्या निरागस बाळाला जन्मापासूनच हृदयाशी संबंधित 2 अवघड समस्या होत्या. तो जन्माला आला तेव्हा तो अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट अर्थात (एएसडी) सेाबत घेऊनच जन्माला आला होता. अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट ( Atrial septal defect) मध्ये, हृदयाच्या वरच्या भागात एक छिद्र असते. यासोबतच त्याचे हृदयाचे डावे वेंट्रिक्युलर निकामी झाले होते, ज्याला लेफ्ट वेंट्रिक्युलर नॉन-कॉम्पॅक्शन कार्डिओमायोपॅथी असे म्हटले जाते.

जन्मजातच असतो हा विकार

वर्ष – 2019 मध्ये जेव्हा मॅक्सवर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला तेव्हा तो फक्त 4 वर्षांचा होता. शस्त्रक्रियेनंतर त्याला घरी नेले असता तो असामान्य वागू लागला. परत त्याला रुग्णालयात आणण्यात आले, अशातच त्याला पक्षाघाताचा झटका आल्याने डॉक्टरही हबकले. स्ट्रोकनंतर त्याच्या अर्ध्या शरीराने काम करणे बंद केले होते. पण, आता तो सामान्य मुलांप्रमाणे आपले जीवन जगत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही सर्व स्थिती अॅट्रियल सेप्टल डिफेक्ट्स (एएसडी) मुळे झाली होती. बाळाला जन्मजात हा विकार उद्भवतो. बर्‍याच लहान मुलांना हृदयाशी संबंधित समस्या असल्याचे आपण बघतो. ज्याचे वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार होऊ शकतात.

एएसडी (एट्रियल सेप्टल दोष) म्हणजे काय ?

ह्रदय रोगाशी संबंधित मायोक्लिनिकच्या मते, हृदयामध्ये चार भाग आणि चार वाल्व असतात. जे एकमेकांशी जोडलेले असतात. एट्रियल सेप्टल डिफेक्ट्स (एएसडी) म्हणजे हृदयाच्या वरच्या भागाच्या भिंतीमध्ये छिद्र असणे असा त्याचा अर्थ लावला जातो. (उजवीकडे आणि डाव्या अट्रिया) मध्ये. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, एट्रियल सेप्टल दोष ASD हा हृदयाशी संबंधित जन्मजात उदभवणारा दोष प्रकार आहे. ASD मध्ये, हृदयाच्या कक्षांच्या भिंतीमध्ये एक छिद्र आहे. या भिंतीला असलेल्या छिद्रामुळे दोन्ही भागांमध्ये रक्त मिसळू लागते. ही समस्या बाळाला जन्मापासूनच उद्भवते. तुलनेत लहान ASD दुर्मिळ आहेत आणि धोका निर्माण करत नाहीत. ही छिद्रे वयानुसार बंद होतात. मात्र, हृदयाला मोठे छिद्र पडल्याने हृदय आणि फुफ्फुसाचे नुकसान होते. अशा वेळेस ASD दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया एकमेव पर्याय शिल्लक असतो.

हे सुद्धा वाचा

ऍट्रियल सेप्टल डिफेक्टचे प्रकार

Secundum:– प्रकार हा ASD चा सर्वात सामान्य गणला गेलेला प्रकार आहे. असे छिद्र हृदयाच्या वरच्या चेंबर्स (Atrial septum) दरम्यान भिंतीच्या मध्यभागी स्थित असते. प्री-मम:- या प्रकारचा एएसडी ऍट्रियल सेप्टमच्या खालच्या भागात परिणाम करतो आणि जन्मजात असू शकतो. सायनस व्हेनोसस:- हा एक दुर्मिळ प्रकारचा ASD आहे जो सहसा हृदयाच्या कक्षांना वेगळे करणाऱ्या भिंतीच्या वरच्या भागात उद्भवतो. कोरोनरी सायनस:- एएसडीचा हा दुर्मिळ प्रकार गणला जातो, कोरोनरी सायनसमधील भिंतीमध्ये आढळतो.

एएसडी दोषांची लक्षणे अशी

ASD असलेल्या अनेक बाळांना सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत. परंतु कालांतराने त्यांना खालील लक्षणे दिसू शकतात. मायोक्लिनिकच्या मते, तुमच्या मुलामध्ये खालीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, ताबडतोब हदयाशी संबधीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– धाप लागणे – मंद किंवा जलद हृदय ताल – खेळताना श्वास लागणे – थकणे – पाय किंवा ओटीपोटात सूज येणे – हृदय गती जलद – धडधडणारे हृदय

एएसडी दोषाची कारणे

ऍट्रियल सेप्टल दोषांची कारणे तज्ज्ञांकडून स्पष्टपणे मांडण्यात आलेली नाहीत. असे म्हटले जाते की, जेव्हा मूल गर्भाशयात असते आणि त्याचे हृदय विकसित होत असते, तेव्हा एएसडी ही हृदयाच्या संरचनेची समस्या उद्भवतांना आढळते. काही प्रकरणांमध्ये ही अनुवांशिक समस्या देखील असू शकते. याशिवाय काही वैद्यकीय परिस्थिती, अतिरीक्त औषधांचा वापर, जीवनशैली,नशा, धुम्रपान किंवा जास्त प्रमाणात मद्यपान यामुळेही ही स्थिती उद्भवू शकते.

एएसडी दोष असल्यास काय होते

जर एखाद्याच्या हृदयात मोठे छिद्र असेल तर ते धोकादायक असू शकते आणि नंतर या समस्या उद्भवू शकतात.

– उजव्या हृदयाची विफलता – हृदयाची लय अयशस्वी – स्ट्रोक(झटका) – अनपेक्षीतपणे लवकर मृत्यू – उच्च रक्तदाबाचा त्रास – फुफ्फुसाचे नुकसान हेाणे इत्यादी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.