बापरे! फ्रेंच फ्राईज खाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी

फ्रेंच फ्राईज, बदलत्या काळानुसारही लोकांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. हे फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे माहित असून सुद्धा याची क्रेझ काय कमी होत नाही. आता एका संशोधनात आढळून आलंय की...

बापरे! फ्रेंच फ्राईज खाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी
French fries unhealthyImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 1:45 PM

मुंबई: फ्रेंच फ्राईज हा अनेक पिढ्यांचा आवडता पदार्थ आहे. बदलत्या काळानुसारही लोकांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. हे फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी हानिकारक आहेत हे माहित असून सुद्धा याची क्रेझ काय कमी होत नाही. आता एका संशोधनात आढळून आलंय की याचा फक्त आरोग्यावर नाही तर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चीनमधील संशोधनात असे आढळले आहे की तळलेले पदार्थ, विशेषत: तळलेले बटाटे यांचे वारंवार सेवन केल्यास नैराश्य आणि चिंता अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जे लोक फ्रेंच फ्राईजसारख्या तळलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन करतात त्यांना अशा पदार्थांचे सेवन न करणाऱ्या लोकांपेक्षा अशा समस्या उद्भवण्याची शक्यता 12 टक्के जास्त असते.

डिप्रेशनच्या बाबतीत संशोधकांना असे आढळले आहे की जे लोक तळलेल्या गोष्टी खात नाहीत त्यांच्यापेक्षा तळलेल्या गोष्टींची आवड असलेल्या लोकांमध्ये नैराश्याचा धोका 7 टक्के जास्त असतो.

PNAS (प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) या नियतकालिकात या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत. संशोधनानुसार, मानसिक आरोग्य जर सांभाळायचं असेल तर तळलेल्या अन्नाचे सेवन कमी करणं गरजेचं आहे.

हे अद्याप सिद्ध झालेले नाही का?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, संशोधनाचे निष्कर्ष प्राथमिक असल्याने तळलेले पदार्थ मानसिक आरोग्याच्या समस्या वाढवतात की मानसिक आरोग्याच्या समस्या असलेले लोक तळलेल्या पदार्थांकडे वळतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हणजे कॅच-22 ची परिस्थिती पुढीलप्रमाणे समजू शकते: आपण चिंताग्रस्त किंवा नैराश्यग्रस्त आहात म्हणून तळलेल्या गोष्टींकडे आकर्षित आहात की तळलेल्या गोष्टीच चिंता किंवा नैराश्यास प्रोत्साहन देतात?

  • कारण चिंता आणि नैराश्याची लक्षणे असलेले लोक बरेचदा आरामदायक पदार्थांकडे वळतात. या अभ्यासात 11.3 वर्षांहून अधिक कालावधीत 140,728 लोकांचे मूल्यांकन केले गेले.
  • तळलेले अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये चिंतेची 8,294 प्रकरणे आणि नैराश्याची 12,735 प्रकरणे आढळली. या आकडेवारीत संशोधनाच्या पहिल्या दोन वर्षांत नैराश्याची लक्षणे असलेल्या लोकांचा समावेश नव्हता.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.