Frequent Urination : वारंवार लघवी लागते ? असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात…

वारंवार लघवी लागणे ही एक गंभीर समस्या असू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही समस्या अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.

Frequent Urination : वारंवार लघवी लागते ? असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात...
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 3:23 PM

नवी दिल्ली– आजकाल लोक अनेक आजार आणि समस्यांना (diseases) बळी पडत आहेत. वाईट जीवनशैलीमुळे लोकांचे आरोग्यही सतत बिघडत आहे. अशा परिस्थितीत बिघडत चाललेल्या तब्येतीकडे (do not ignore health)दुर्लक्ष करणे कधीकधी आपल्याला महागात पडते. शरीरात उद्भवणारी प्रत्येक समस्या आणि आजाराची काही लक्षणे असतात, जी वेळीच ओळखली तर गंभीर परिणामांपासून दूर राहता येते. वारंवार लघवी होणे हे देखील असेच एक लक्षण आहे, जे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. जर तुम्हालाही वारंवार लघवी ( frequent urination) लागत असेल तर त्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका.

मधुमेह

जर तुम्हाला अचानक वारंवार लघवी लागण्यास सुरुवात झाली असेल तर ते मधुमेहामुळे असू शकते. साधारणपणे एखादी व्यक्ती दिवसाला तीन लिटर पर्यंत लघवी करते, पण जेव्हा मधुमेह होतो तेव्हा ते प्रमाण 20 लिटरपर्यंत वाढतो. जर तुम्ही दिवसातून 7 ते 10 वेळा लघवी करत असाल तर ते टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाचे लक्षण असू शकते.

हे सुद्धा वाचा

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)

वारंवार लघवी होणे हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे म्हणजे मूत्रमार्गाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच यूटीआय हा मूत्रमार्गात होणारा संसर्ग आहे. वारंवार लघवी होणे, वेदना आणि जळजळ होणे, लघवी करण्याची तातडीची गरज वाटणे, पोटात मुरड येणे आणि लघवीमधून रक्त येणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत.

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर (OAB)

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर (OAB) च्या स्थितीतही वारंवार लघवी लागू शकते. ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरची समस्या असेल तर एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवी करण्याची इच्छा होते, ज्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. अशा परिस्थितीत अनेक वेळेस काही लोकांना अचानक लघवी होण्याचा अनुभव येतो.

पुरुषांना वारंवार लघवी लागणे

जर पुरुषांना वारंवार लघवीची समस्या येत असेल तर हे प्रोस्टेटशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते. वाढलेले प्रोस्टेट, संसर्गामुळे प्रोस्टेटची जळजळ (प्रोस्टेटायटीस), आणि प्रोस्टेटचा कॅन्सर यासारख्या परिस्थितींमुळे पुरुषांना वारंवार लघवीचा अनुभव येऊ शकतो.

महिलांना वारंवार लघवी लागणे

महिलांबद्दल बोलायचं झालं तर यूटीआय, ओएबी, मूत्राशय संक्रमण आणि मधुमेह व्यतिरिक्त, इतर समस्यांमध्येदेखील महिलांना वारंवार लघवी लागू शकते. गर्भधारणा, फायब्रॉइड्स, रजोनिवृत्ती, गर्भाशयाचा कॅन्सर आणि कमी इस्ट्रोजेन पातळीमुळे हे होऊ शकते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.