सिगारेट ओढणाऱ्यांना कोविडचा धोका किती?, नॉन स्मोरकर्सही किती सुरक्षित?; अभ्यासातून उघड झालेली धक्कादायक माहिती काय?
सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांना पॅसिव्ह स्मोकिंग किंवा सेकंड हँड स्मोकिंग म्हटलं जातं. कारण तुम्ही सिगारेट ओढत नसला तरी सिगारेटचा धूर तुमच्या शरीरात जातो.
नवी दिल्ली : कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घ्या. मात्र, तुम्ही सिगारेट ओढत नसाल, पण सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहत असाल तर तुम्हाला कोरोनाची पटकन लागण होऊ शकते. केवळ सिगारेट ओढणाऱ्यासोबत राहणंही तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. एम्स गोरखपूरच्या एका अभ्यासातून ही धक्कादायक आणि आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. सहा राज्यांच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
पॅसिव्ह स्मोकिंग आणि कोविडचं गांभीर्य याची लिंक काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. यावेळी जे लोक सिगारेट ओढतात त्यांना कोरोनाचा धोका असल्याचं आढळून आलं. मात्र, सिगारेट ओढत नसतानाही केवळ सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांनाही कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अशा लोकांना गंभीर कोरोनाची लागण होऊ शकते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
तरीही धूर तुमच्या शरीरात जातो
सिगारेट ओढणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांना पॅसिव्ह स्मोकिंग किंवा सेकंड हँड स्मोकिंग म्हटलं जातं. कारण तुम्ही सिगारेट ओढत नसला तरी सिगारेटचा धूर तुमच्या शरीरात जातो. एम्स गोखरपूरच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुरेखा किशोर म्हणाल्या की, स्मोकिंग करणाऱ्यापेक्षा सेकंड हँड स्मोकर्समध्ये कोविड अधिक गंभीर होऊ शकतो, असं आमच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. घर आणि कामाच्या ठिकाणी सेकंड हँड स्मोकर्स आणि स्मोकर्समध्ये कोविड किती गंभीर असू शकतो हे तपासण्याच्या हेतूने हा अभ्यास करण्यात आला.
अभ्यासात काय आढळले?
स्मोकिंग केल्याने कोविड 19च्या संसर्गाची शक्यता आणि आजाराची गंभीरता वाढू शकते
सेकंड हँड स्मोकमध्ये 7 हजाराहून अधिक केमिकल्स असतात. त्यामुळे लंग कँन्सर, हृदयाशी संबंधित आजार आणि फुफ्फुसाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे कोविडची गंभीरता वाढते.
कोरोनामुळे गंभीररित्या आजारी पडलेल्या 18 वर्ष वयाच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांना या अभ्यासात सामील करून घेण्यात आलं होतं. ज्यांच्यामध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे होती अशांचा डेटाही घेण्यात आला होता. हे रुग्ण जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान रुग्णालयात भरती झाले होते.
लोक घरात पॅसिव्ह स्मोकिंगच्या संपर्कात येतात, अशा लोकांमध्ये कोविडची गंभीर लागण होण्याची शक्यता अधिक असते. नॉन स्मोकर्सच्या तुलनेत ही शक्यता 3.3 टक्ते अधिक असते. अशा प्रकारचे लोक कामाच्या ठिकाणी सेकंड हँड स्मोकिंगच्या संपर्कात येतात. त्यांच्यात कोरोनाचा धोका 2.19 टक्के असतो.