अर्ध्या किमतीत हेल्थ विमा; आरोग्य विम्याच्या संरक्षणातून बिमारींचा करा सामना

कोरोनामुळे अनेक भारतीयांना आरोग्य विम्याचे महत्व कळाले. लाखोंच्या हॉस्पिटल बिलामुळे लोकांची सुरक्षित ठेव मोडली, गाठिशी असलेला पैसा संपला. आरोग्य विमा घेण्याची इच्छा असुनही महागड्या हफ्त्यामुळे अनेकांना मन मारावं लागत आहे. अशा वेळी स्वस्तात आरोग्य विमा कसा मिळवता येईल, हे जाणून घेऊयात.

अर्ध्या किमतीत हेल्थ विमा; आरोग्य विम्याच्या संरक्षणातून बिमारींचा करा सामना
आरोग्य विमा
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 3:20 PM

कोविड (COVID) महामारीने जगाला कवेत घेतले आणि सर्व सामान्यांना वेठीस धरले. प्रियजन, आप्तस्वकीयांना वाचविण्यासाठी अनेक जण होरपळले. अचानक आलेली लाखोंची बिलं फेडता फेडता बचत केव्हा संपली, उसनवारी कशी झाली हेच कळलं नाही. त्यानंतर अनेकांनी भविष्यात रुग्णालयांच्या बिलाला तोंड देण्यासाठी आरोग्य विमा कंपन्यांकडे धाव घेतल. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रुप विम्याचं संरक्षण मिळाले. पण  सर्वसामान्यांना विम्याच्या हप्त्याने दरारुन घाम फुटला. अवाक्या बाहेर असलेल्या विमा हफ्ता रक्कमेमुळे अनेकांनी आरोग्य विमा योजनेकडे पाठ फिरवली. पण आता तुम्हाला आरोग्य विमा संरक्षण मिळू शकते, तेही अर्ध्या किंमतीत, चला तर जाणून घेऊयात.

सध्या सर्व आघाडीच्या बॅंका ग्राहकांना आरोग्य विमा कवच देत आहेत. विमा कंपन्यांकडून थेट विमा खरेदी करण्यापेक्षा बॅंकेकडून खरेदी केलेली विमा योजना अर्ध्या किंमतीत मिळत आहे.

खरंतर  सर्वसाधारण विमा विक्री करणाऱ्या कंपन्याचीच आरोग्य विमा योजना बॅंका विक्री करत आहेत. सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्या जशी ग्रुप पॉलिसी घेऊन आरोग्य विम्याचे संरक्षण पुरवितात, त्याच धर्तीवर बॅंका विमा विक्री करत आहेत. विमा कंपनी आणि बॅंकेत त्यासाठी करार करण्यात आलेले असतात.

विम्याचे फायदे

या विम्याचे अनेक फायदे आहेत. काही कंपन्यांनी सर्व वयाच्या लोकांसाठी एक समान प्रिमियम ठरविला आहे. वयोवृद्धांसाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी फार गरजेची आहे. या योजनेतंर्गत 80 वर्षांच्या नागरिकांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. पूर्वी विमा पोर्ट करण्याची सुविधा नव्हती आता ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे पती-पत्नी, मुलं अशा न्युक्लिअर फॅमिलीसाठी योजना फायद्याची आहे. यासाठीचा प्रिमीयम ही महाग नाही. उदाहरणार्थ एखाद्या 55 वर्षीय व्यक्तीला चार सदस्यांसाठी आरोग्य विमा खरेदी करायचा असेल तर त्याला 50 ते 60 हजारांचा प्रिमिअम भरावा लागेल. तर बॅंकेकडून हा विमा 13 हजार रुपये प्रिमिअम न मिळेल.

स्वस्तात विमा संरक्षण मिळण्याची कारणे

विमा कंपन्या त्यांच्या पॉलिसी ग्रुप विमा योजनेतंर्गत विक्री करतात. बॅंकांकडे कोट्यवधी ग्राहक आहेत.बॅंकेवरील विश्वासामुळे ग्राहक त्यांच्याकडून विमा खरेदी करतो. त्यामुळे त्याला विमा योजनेत कमी प्रिमिअम मध्ये विमा संरक्षण मिळते. मात्र तुम्ही बॅंक खाते बंद केल्यास तुम्ही विम्याच्या फायद्यांपासून वंचित राहू शकता. विमा पॉलिसी खरेदी पूर्वी योजनेची, अटी व शर्तींची पूर्ण माहिती घ्या.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...