Suraksha Bandhan : टीव्ही9 आणि गल्फ ऑईलकडून ट्रक ड्रायव्हरांसाठी महा आरोग्य शिबीर; 11 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवली जाणार

| Updated on: Aug 07, 2022 | 3:14 PM

Suraksha Bandhan : टीव्ही 9 आणि गोल्फ ऑईलने आयोजित केलेल्या या शिबीराचं ट्रक चालकांनी प्रचंड स्वागत केलं आहे. आम्ही या शिबीराचा योग्य लाभ घेत आहोत. त्यातून आम्हाला फायदा होत आहे. शिवाय आम्हाला विम्याचीही सुरक्षा देण्यात आली आहे, असं एका ट्रकचालकाने सांगितलं.

Suraksha Bandhan : टीव्ही9 आणि गल्फ ऑईलकडून ट्रक ड्रायव्हरांसाठी महा आरोग्य शिबीर; 11 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवली जाणार
टीव्ही9 आणि गल्फ ऑईलकडून ट्रक ड्रायव्हरांसाठी महा आरोग्य शिबीर; 11 ऑगस्टपर्यंत मोहीम राबवली जाणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: ट्रक ड्रायव्हर (Truck Drivers) आपला जीव धोक्यात घालून रात्र न् दिवस गाडी चालवत असतात. कामानिमित्ताने कधी 15 दिवस तर कधी महिनाभरही ते घराकडे फिरकत नाहीत. सातत्याने बाहेर असतात. त्यामुळे त्यांची खाण्याची आणि राहण्याचीही आबाळ होते. अशावेळी जीवनशैलीत बदल झाल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतात. अनेक ट्रक चालकांना विविध व्याधींनी ग्रासले जाते. या ट्रक चालकांच्या आरोग्याची म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही. त्यांना कोणतंही आरोग्याचं संरक्षण नसतं. त्यामुळे ट्रक चालकांच्या या समस्या जाणून घेऊन टीव्ही 9ने एक पाऊल पुढे टाकले आहे. या ट्रक चालकांचं आरोग्य ठणठणीत राहावं म्हणून टीव्ही 9ने (Tv9 Network) गोल्फ ऑईलच्या साथीने महा आरोग्य शिबीराचं (health camp) आयोजन केलं आहे. या शिबीरातून ट्रक ड्रायव्हरांची आरोग्य तपासणी केली जात असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत.

टीव्ही 9 ने गल्फ ऑईलच्या साथीने गल्फ सुपरफ्लिट सुरक्षा बंधन सीजन-4 (Gulf Superfleet Suraksha Bandhan season 4) सुरू केला आहे. या माध्यमातून ट्रक ड्रायव्हरांसाठी मोफत आरोग्य सेवा शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. त्याचा लाभ हजारो ट्रक ड्रायव्हर घेत असून या आरोग्य शिबिरामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

कधीपर्यंत शिबीर

टीव्ही-9 आणि गोल्फ ऑईलने सुरू केलेलं हे आरोग्य शिबीर 3 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत ट्रक ड्रायव्हरांना आरोग्याशी संबंधित सर्व उपचार दिले जाणार आहेत.

कुठे कुठे शिबीर?

3 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान देशातील 12 प्रमुख आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये हे आरोग्य शिबीर पार पडणार आहे. दिल्ली, मुंबई, इंदूर, नालागड, धारुहेडा, फरिदाबाद, जयपूर, लुधियाना, कोलकाता, कानपूर, सुरत आणि वाराणासी आदी शहरात हे शिबीर पार पडणार आहे.

उद्देश काय?

ट्रक चालक सातत्याने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांची खाण्याची, राहण्याची आबाळ होते. कोणत्याही हॉटेलात जेवणं, मिळेल त्या ठिकाणी झोपणं यामुळे ट्रक चालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. परिणामी त्यांना विविध व्याधी जडतात. त्यांच्या या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांच्या समस्यांचं निराकरणही करण्यात येणार आहे.

ट्रक चालकांना काय वाटतं?

दरम्यान, टीव्ही 9 आणि गोल्फ ऑईलने आयोजित केलेल्या या शिबीराचं ट्रक चालकांनी प्रचंड स्वागत केलं आहे. आम्ही या शिबीराचा योग्य लाभ घेत आहोत. त्यातून आम्हाला फायदा होत आहे. शिवाय आम्हाला विम्याचीही सुरक्षा देण्यात आली आहे, असं एका ट्रकचालकाने सांगितलं. तर टिव्ही 9ने आमचा चांगला विचार केला आहे. आम्ही 15 ते 20 दिवस घराबाहेर असतो. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. अशा आरोग्य शिबिरामुळे आम्हाला लाभ होणारच आहे, असं दुसऱ्या ट्रक चालकाने सांगितलं.