Hair Fall : केस गळण्याच्या समस्या मागे जास्त एक्सरसाइज करणे हे कारण तर नाही ना कारणीभूत?, जाणून घ्या या मागील इंटरेस्टिंग माहिती

जिमला जाणाऱ्या लोकांमध्ये अनेक लोकांमध्ये केस गळतीची समस्या प्रामुख्याने पाहायला मिळते. जे लोक नियमितपणे एक्ससाइज करत आहेत अशा लोकांमध्ये खूपच कमी वयात केस गळतीची समस्या उद्भवत आहे.या कारणामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. जर तुम्हीसुद्धा या लोकांपैकी एक असाल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी या समस्या मागील इंटरेस्टिंग कारण आणि त्याबद्दलची उपाय सुद्धा सांगणार आहोत.

Hair Fall : केस गळण्याच्या समस्या मागे जास्त एक्सरसाइज करणे हे कारण तर नाही ना कारणीभूत?, जाणून घ्या या मागील इंटरेस्टिंग माहिती
केस गळती समस्या
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 11:37 PM

मुंबई : फिट राहिल्याने हेल्दी लाइफ स्टाइल जगण्याने (Healthy lifestyle), आजारांपासून दूर राहण्यासाठी (Stay away from diseases) नियमितपणे एक्सरसाइज (Regular exercise) करणे गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की ते नियमितपणे एक्सरसाइज करत असतात. एक्सरसाइज शिवाय अन्य फिजिकल एक्टिविटी जसे की, वॉकिंग, जॉगिंग, साइकिलिंग, हाई इंटेंसिटी एक्सरसाइज, योग इत्यादी प्रकारचे एक्सरसाइज केल्याने आपले शरीर फिट राहण्यासाठी मदत होते.नियमितपणे एक्सरसाइज केल्याने आपले वजन कमी होण्यासाठी आणि मसल्स गेन करण्यामध्ये सहाय्यता होते त्याचबरोबर वर्कआउट केल्यानंतर अनेक लोकांना केस गळतीची (hair fall problem) समस्या प्रामुख्याने सतावत आहे. जर तुम्हाला सुद्धा नियमितपणे एक्सरसाइज केल्याने केस गळतीची समस्या त्रास देत असेल तर आज आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

एका अभ्यास अंतर्गत असे सिद्ध झाले आहे की, अधिक प्रमाणामध्ये एक्ससाइज करणे हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते. खरेतर अधिक वेळ एक्सरसाइज केल्याने आपल्या शरीरावर ताण निर्माण होतो ज्यामुळे टेलोजेन एफ्लुवियम (Telogen effluvium) च्या दोन मुख्य कारणांपैकी एक आहे. टेलोजेन एफ्लुवियम ही अशी एक स्थिती आहे, ज्यामध्ये केस वेळेच्या आधी दिले पडतात आणि अधिक तर केस आपले गळण्यास सुरुवात होऊ लागते.

केस गळती आणि एक्सरसाइज

जास्त प्रमाणात केलेले एक्ससाइज केसांच्या वाढण्याचे जे पॅटर्न असते त्याला बिघडते आणि यामुळे केस गळतीची समस्या सुरू होते.एन्हांस एस्थेटिक एंड कॉस्मेटिक स्टूडियो चे कॉस्मेटिक आणि हेयर ट्रांसप्लांट सर्जन डॉ मनोज खन्ना यांच्या मते, कोणत्याही प्रकारचे एक्सरसाइज केल्याने शरीरासोबत आपल्या केसांवर सुद्धा तनाव निर्माण होतो जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज केल्याने आपल्या केसामध्ये टेलोजन स्टेज लवकर येते आणि या स्टेजमध्ये आपले केस गळण्याचे प्रमाण वाढू लागते आणि अशा वेळी केस गळण्यास सुरुवात होते.

अमेरिकन एकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी यांच्या मते एक्सरसाइज करते वेळी असे घडणे हे अस्थायी स्वरूपाचे असते. जसे आपल्या शरीरामध्ये तणावाचे प्रमाण कमी असते तसेच ते सुद्धा हळूहळू कमी होते आणि म्हणूनच केसांची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होऊ लागते त्याचबरोबर केस गळण्यासाठी बाजारातील केमिकल प्रॉडक्ट सुद्धा कारणीभूत ठरतात जर आपल्या प्रॉडक्टच्या जास्त प्रमाणामध्ये उपयोग केला तर आपले केस गळू लागतात. अकाली केस पांढरे पणा येऊ लागते आणि त्याचबरोबर जास्त प्रमाणात औषधांचे सेवन योग्य आहार सेवन न करणे या समस्या सुद्धा उद्भवू लागतात परंतु यामागे अधिक एक्सरसाइज हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण ठरते.

सर्वसाधारण पणे केस गळण्याची मर्यादा किती?

अमेरिकन एकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी यांच्या मते प्रतिदिन 50-100 केस गळणी सर्वसाधारण आहे यालाच मेडिकल भाषेमध्ये टेलोजन एफ्लुवियम असे म्हणतात.

किती एक्सरसाइज गरजेचे?

अनेकांना किती प्रमाणामध्ये एक्सरसाइज करावे याबद्दलची माहिती नसते. एक्सपर्ट यांच्या मते झोप न लागण्याची समस्या, अशक्तपणा ,गरजेपेक्षा अधिक मेहनत करणे या सगळ्या समस्या जास्त प्रमाणात एक्ससाइज केल्याने उद्भवतात. जर एखादी व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये एक्ससाइज करते तर तेव्हा त्याच्या शरीरातील फॅट कमी होऊ लागतात. जर एखाद्या व्यक्तीचे सामान्य क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात केस गळत असतील तर अशा वेळी व्यायाम करण्याचे प्रमाण सुद्धा कमी करायला हवे.

केस गळतीवर उपाय

एक्सपर्ट असे सांगतात की योग्य प्रमाणामध्ये जर आपण नियमितपणे आवश्यक आहार केला आणि एक तास चांगल्या पद्धतीने एक्ससाइज केला तर तुमची केस गळतीची समस्या काही प्रमाणात थांबवता येते. एक्ससाइज पाहायला गेले तर कोणत्याही स्वरूपामध्ये होऊ शकते यासाठी तुम्ही दिवसभरातून पाच ते दहा मिनिटे जॉगिंग किंवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस नियमितपणे चालणे अशा पद्धतीचा सुद्धा करू शकतात. केस गळती समस्या थांबण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त विटामिन ई युक्त पदार्थ प्रोटीन युक्त पदार्थ मिनरल या सर्वांचा समावेश करायला हवा यामुळे तुमची केस गळतीची समस्या मुळापासून नष्ट होईल. अतिरिक्त एक्सरसाइज केल्याने शरीरातील फॅट आणि कार्बोहाइड्रेट कमी होतात म्हणून केस गळती समस्या रोखण्यासाठी योग्य प्रमाणात डायट घ्यायला हवा.

टिप्स : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या :

Health care: हळदीयुक्त दूधच नाही तर हळदीच्या पाण्याचेही अनेक फायदे ,रोगप्रतिकारक शक्ती होईल दुप्पट!

PHOTO | कानामध्ये मळ जमा झाला आहे तर करू नका चिंता, या घरगुती उपचाराने सहजरीत्या काढा कानातील मळ!

जेवण झाल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते, शरीर कंप होते?; जाणून घ्या त्यामागची वैज्ञानिक कारणे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.