अकाली टक्कल पडल्यानं अवघडलेपण आलंय? जाणून घ्या अत्याधुनिक उपचार पद्धत

अकाली केस गळती आणि टक्कलपण समस्या सध्या अनेकांना सतावत आहे. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तुम्हाला अनेक समस्या सहन कराव्या लागतील म्हणून यावर योग्य अत्याधुनिक उपचार पद्धत जाणून घेणे गरजेचे आहे.

अकाली टक्कल पडल्यानं अवघडलेपण आलंय? जाणून घ्या अत्याधुनिक उपचार पद्धत
टक्कल
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:07 AM

मुंबई : सध्या लहान मुलांपासून ते तरुण पर्यंत एक समस्या प्रामुख्याने सतावत आहे ती म्हणजे केसांची समस्या(hair problem)आपल्यापैकी अनेकांना केस गळती, केसांमध्ये होणारे इन्फेक्शन, अकाली टक्कलपण अशा विविध समस्या निर्माण होत आहेत आणि म्हणूनच अनेकदा तरुणांमध्ये सुद्धा ही समस्या आपल्याला त्रास देत आहे. या समस्या मागे कारणे देखील वेगवेगळे आहेत परंतु जर आपल्याला अकाली टक्कल आले तर अशावेळी आपला आत्मविश्वास ढासळून जातो आणि आपला चेहरा सुद्धा खराब होतो. डॉक्टर सतीश वैष्णव (Satish Vaishnav) हे गेल्या 32 वर्षापासून केसांच्या संबधित प्रत्येक समस्यांवर ते उपचार करत आहे. केस विकार तज्ञ म्हणून डॉक्टरांची विशेष अशी ओळख सुद्धा आहे. या क्षेत्रात अमुलाग्र कामगिरी केल्याबद्दल डॉक्टरांना केस रत्न या पारितोषिकाने (Kesh Ratna Award) सन्मानित करण्यात आले आहे. टिव्ही 9 मराठी शी बातचीत करताना डॉक्टरांनी या समस्यांमागील अनेक पैलू उलगडून सांगितले म्हणून आज आपण अकाली टक्कलपण व त्यासाठी नेमक्या कोण कोणत्या आधुनिक उपचार पद्धती आहेत ते जाणून घेणार आहोत.

अकाली टक्कलपण आल्याने अवघडलेपण येतेय?

बहुतेक वेळा अकाली टक्कलपण आल्यामुळे अनेकांना आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागली आहे. आपल्या आजूबाजूला अशी मंडळी आहेत जी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये खूपच हुशार, गुणवंत आहेत परंतु अकाली टक्कल आल्यामुळे अनेकांना अवघडल्यासारखे वाटते,त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे हरवून जातो. बहुतेक वेळा तरुण मंडळी एखादी नोकरी मिळवण्यासाठी मुलाखतीला जातात तेव्हा टक्कल पडलेले असल्यामुळे त्यांना अवघडल्या सारखे जाणवते अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडलेल्या पाहायला मिळतात, अशावेळी नोकरी लवकर मिळत नाही त्याचबरोबर अनेक तरुण-तरुणींना लग्न जमवताना सुद्धा अकाली टक्कल पण ची समस्या त्रास देते अशावेळी मुलांना लवकर विवाहासाठी मुलगी मिळत नाही. अनेकदा केस पातळ असल्यामुळे केसांमध्ये टक्कल लगेच पडते म्हणूनच ही समस्या ज्येष्ठ मंडळी मध्ये तर पाहायला मिळते पण त्याचबरोबर तरुणांमध्ये सुद्धा प्रामुख्याने दिसून येते.

उपचार पद्धती

अकाली टक्कलपण जरी आले असले तरी योग्य उपचार पद्धतीने गेलेले केस परत मिळवू शकतो. याबाबत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असतो परंतु केस गळती मागे व टक्कल पडण्या मागे काही कारणे असतात, ही कारणे शोधणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अनेकदा बाह्य गोष्टी कारणीभूत ठरतात तर अनेकदा अंतर्गत करणे सुद्धा कारणीभूत ठरते. जेव्हा आपण बाहेरील गोष्टीबद्दल विचार करतो तेव्हा काही जणांना गरम पाणी, बोरवेलचे पाणी यासारख्या गोष्टींमुळे केसांत इन्फेक्‍शन होते तसेच काही जणांचे अनुवंशिकता हे कारण असते जसे वडिलांचे टक्कल पडले असेल तर पुढील पिढीचे सुद्धा टक्कल पडते.

हेअर डॉक

या उपचार पद्धतीत कोणतेही ऑपरेशन व सर्जरी शिवाय तुमचे गेलेले केस परत मिळवले जाते. या पद्धतीत रुग्णांच्या केस गळती व टक्कलपण यामागील कारणे शोधून उपचार केले जाते. हेअर स्कॅनिंग केल्यानंतर केसांच्या मुळांची टेस्टिंग केली जाते ज्यामुळे केस गळती व टक्कल पडण्याचे कारण शोधले जाते. इंटर्नल मेडीसीन द्वारे रुग्णाला काही औषधे दिली जातात जेणेकरून शरीरामध्ये काही झीज झाली असेल तर ती भरून निघेल त्याचबरोबर ओरल ट्रीटमेंट सुद्धा रुग्णांना दिली जाते. यामध्ये केसांना तेल ,शाम्पू ,आवश्यक सिरम जेणेकरून केसांची निगा व्यवस्थित राहिली जाईल याची काळजी घेतली जाते. तसेच हल्ली फोटोसिंथेसिस नावाची ट्रीटमेंट सुद्धा नवीन आलेली आहे ती सुद्धा रुग्णांवर वापरली जाते. हि ट्रीटमेंट फक्त हेअर डॉक मध्येच उपलब्ध आहे. संक्षिप्त स्वरूपात सांगायचे झाल्यास हेअर डॉक ही एक नैसर्गिक उपचारपद्धती आहे आणि त्याचबरोबर सुरक्षित उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमुळे रुग्णांना कोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही.

रुट गोल्ड ट्रीटमेंट

केसांना आलेले अकाली टक्कलपण दूर करण्यासाठी अत्याधुनिक उपचार पद्धती सुद्धा केली जाते ,त्यामध्ये रुट गोल्ड ट्रीटमेंटचा प्रामुख्याने समावेश केला जातो. ही पद्धत सुद्धा अगदी नैसर्गिक आणि संशोधनपर केल्या गेलेल्या औषधांवर आधारित आहे. ही परसियाना अमेरिकाना नावाच्या या इंटरनॅशनल फूडच्या स्टेम सेल पासून तयार झालेली आहे म्हणून ही उपचार पद्धती अगदी सुरक्षित आहे. ही 360 डिग्री पद्धतीने कार्य करते. हेअर फोलिकल यामुळे मजबूत बनतात. या उपचार पद्धतीचा फायदा असा की यामुळे तुमच्या केसांची गळती थांबते आणि ज्या ठिकाणी केस गेलेले होते अशा ठिकाणी पुन्हा नव्याने केस उगवतात म्हणून या ट्रीटमेंट च्या आधारे रुग्णांच्या केसांच्या समस्या दूर केले जातात आणि रुग्णांचा झोप गमावलेला आत्मविश्वास आहे तो पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

टिप्स : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या :

वाढत्या वजनाला हलक्यात घेऊ नका! लठ्ठपणामुळे स्त्रियांना होणारे आजार कोणते?

लिंबाचं अतिसेवन तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक! काय आहे कारण आणि होणारे दुष्परिणाम?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.