हिवाळ्यात वारंवार लघवी लागते ? जाणून घ्या त्यावरील उपाय

हिवाळ्यात त्वचे सोबत आरोग्याची ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचे सोबत आरोग्याच्या ही अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात एक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते ती म्हणजे वारंवार लघवी येण्याची. तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घेऊ काही टिप्स ज्यामुळे तुम्हाला या समस्येतून काही प्रमाणात आराम मिळेल.

हिवाळ्यात वारंवार लघवी लागते ? जाणून घ्या त्यावरील उपाय
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 5:32 PM

हिवाळा सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत. हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या आणि त्वचे संबंधित समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्यात शरीराची आणि त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यासोबतच हिवाळ्यात आणखीन एक समस्या निर्माण होते ती म्हणजे पुन्हा पुन्हा लघवीला जाणे.

हिवाळ्यामध्ये एकदा पांघरून घेऊन झोपल्यानंतर कशासाठीही उठावे वाटत नाही पण लघवीसाठी मात्र अनेक वेळा उठावे लागते. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात जास्त लघवी येते विशेषतः रात्री झोपल्यानंतर. सारखे सारखे लघवीला उठल्यानंतर झोप मोड होते आणि नंतर झोप लागत नाही शिवाय थंडीत बाहेर गेल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता ही निर्माण होते. जर तुम्ही ही हिवाळ्यात या समस्येमुळे त्रस्त असाल तर जाणून घेऊया काही आश्चर्यकारक टीप ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होईल.

हिवाळ्यात वारंवार का येते लघवी? उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात जास्त लघवी होते असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल कदाचित तुम्हालाही हे जाणवले असेल पण असे का होते याचे उत्तर तुम्हालाही माहिती नसेल. खरंतर जसजसा हिवाळा वाढत जातो तसे तसे योग्य तापमान राखण्यासाठी आपल्या शरीरात जास्त प्रमाणात रक्ताभिसरण सुरू होते. आपल्याला जेव्हा जास्त थंडीत जाणवते तेव्हा आपले हृदय सामान्य स्थिती पेक्षा वेगाने रक्ताभिसरण करू लागते. यामुळे किडनी सारखे आपले इतरही अवयव वेगाने काम करू लागतात. त्यामुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवते. जाणून घेऊया ही समस्या कमी करण्यासाठी काही टिप्स.

वारंवार येणारी लघवी कशी थांबवावी?

हिवाळ्यात अनेक जण वारंवार लघवी येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. वारंवार लघवी येऊ नये यासाठी अनेक जण पाणी कमी पितात. तर हे करणे अजिबात योग्य नाही. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कोणताही ऋतू असला तरी शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही इतर काही गोष्टी लक्षात ठेवू शकता.

हिवाळ्यात सामान्य पाणी पिण्यापेक्षा तुम्ही थोडे पाणी कोमट करून पिऊ शकतात. याशिवाय शरीर उबदार ठेवण्यासाठी विशेषतः कान झाकून ठेवा. चहा आणि कॉफी सारख्या कॅफिन युक्त पदार्थांचा वापर कमी प्रमाणात करा. याशिवाय रात्री गरम दुधासोबत हळद, केशर, दालचिनी आणि अंजीर चे सेवन करा. तुमची खोली आणि घर शक्य होईल तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टींसह तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. ज्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.