सारखा सर्दीचा त्रास होतोय? चिंता करू नका, ‘हा’ आयुर्वेदिक काढा घ्या!
इम्युनिटी वाढवण्यासाठी काही मसाल्याचे पादार्थ आणि औषधी वनस्पतींपासून एका काढ्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा काढा तुम्हाला सर्दी, खोकला या सारख्या व्हायरल इन्फेक्शन्सपासून दूर ठेवतो. तसेच या काढ्याच्या सेवनाने तुमची इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते.
व्हायरल इन्फेक्शन्सपासून वाचण्यासाठी योग्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, नियमित मास्कचा वापर करणे, स्वच्छता ठेवणे या सारख्या काही मुलभूत गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. मात्र त्याचसोबत तुमचा आहार कसा आहे. तु्मच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, कोणत्या गोष्टी आहारात टाळाव्यात या गोष्टी देखील महत्त्वपूर्ण ठरतात. पालेभाज्या, फळ आणि काही प्रकारच्या मसाल्यांचे पदार्थ हे तुमच्यामधील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तुमच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढल्यास तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन्सचा धोका हा कमी असतो.
इम्युनिटी वाढवण्यासाठी काढा
इम्युनिटी वाढवण्यासाठी काही मसाल्याचे पादार्थ आणि औषधी वनस्पतींपासून एका काढ्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा काढा तुम्हाला सर्दी, खोकला या सारख्या व्हायरल इन्फेक्शन्सपासून दूर ठेवतो. तसेच या काढ्याच्या सेवनाने तुमची इम्युनिटी वाढण्यास देखील मदत होते. या काढ्यामध्ये ताजे आदरक, गुळ. काळे मिरे, दालचीनी. लवंग, अजवाईन, इलायची आणि घरी तयार केलेला चहा मसाला इत्यादी मसाल्यांच्या पदार्थ्यांचा समावेश असतो.
असा तयार करा काढा
एका खोल भांड्यामध्ये पाणी घ्या, या भाड्यांमध्ये किसलेली आदरक, दोन ते तीन लंवगा, थोडासा गूळ, तीन चार काळी मिरी, एक दोन इलायची, थोडासा चहाचा मसाला या सर्व गोष्टी टाकून घ्या. त्यानंतर हे पाणी काळे होईपर्यंत गॅसवर उकळून घ्या. त्यानंतर या पाण्याला थंड होऊ द्यावे, पाणी थंड झाल्यानंतर ते गाळून घ्या आणि प्या. या काढ्यामुळे सर्वात मोठा फायदा असा होतो की या काढ्यामध्ये वापरण्यात आलेले सर्व घटक हे उष्ण आहेत. त्यामुळे तुमचा सर्दीपासून बचाव होतो. तसेच या काढ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने तुमचा व्हायरल इन्फेक्शन्सपासून बचाव होतो.