ह्रदयरोग म्हणजे काय, कारणे आणि उपचारपद्धती जाणून घ्या प्रसिध्द डाॅक्टरांकडून!
फक्त भारतामध्येच नाहीतर संपूर्ण जगामध्ये ह्रदयरोगाच्या (Heart disease) रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. विशेष आणि धोकादायक बाब म्हणजे ह्रदयरोगामध्ये मृत्युचे (Death) प्रमाणही अधिक वाढले आहे. हृदयरोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नसून यामध्ये हाय ब्लडप्रेशर आणि पॅरालिसिस, हार्ट अटॅक या सगळ्यांचा समावेश होतो.
मुंबई : फक्त भारतामध्येच नाहीतर संपूर्ण जगामध्ये ह्रदयरोगाच्या (Heart disease) रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. विशेष आणि धोकादायक बाब म्हणजे ह्रदयरोगामध्ये मृत्युचे (Death) प्रमाणही अधिक वाढले आहे. हृदयरोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नसून यामध्ये हाय ब्लडप्रेशर आणि पॅरालिसिस, हार्ट अटॅक या सगळ्यांचा समावेश होतो. एका नवीन संशोधणानुसार एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्या संशोधणानुसार (Research) हे सिध्द होत आहे की, भारतामध्ये 25 टक्के लोक हे हार्ट अटॅकमुळे मृत्युमुखी पडत आहेत आणि ही भारतासाठी अत्यंत धोक्याची घंटा म्हणावे लागेल. ह्रदयरोग म्हणजे नेमके काय आणि त्यावर कुठे उपचार हे केले जाऊ शकतात, निरोगी होण्यासाठी याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत प्रसिध्द डाॅक्टर अजित मेहता यांच्याकडून.
ह्रदयरोग म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊयात!
भारतामध्ये जवळपास 30 टक्के लोकांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे. मात्र, यामध्ये लोकांना हेच माहिती नसते की, आपल्याला हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे. हाय ब्लडप्रेशरमुळे हिडनी फेल, हार्ट अटॅक होण्याची शक्यता असते. यामुळेच ब्लडप्रेशर आणि हार्ट अटॅक हे एकमेंकाबरोबर चालणारे आजार आहेत. हाय ब्लडप्रेशरची समस्या असलेले 25 टक्के लोक हे गोळ्या घेतात. मात्र, तरीही त्यांचे हाय ब्लडप्रेशर नियंत्रणामध्ये नसते आणि ही सुध्दा एक चिंतेची बाब आहे. भारतामध्ये ह्रदयरोगाची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच आणि धोकादायक पातळीवर पोहच आहे. कारण तरूण वयामध्ये देखील ह्रदयरोगाची समस्या निर्माण होताना दिसते आहे.
हार्ट अटॅकची काही प्रमुख लक्षणे
इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतीयांना 10 ते 15 वर्ष अगोदरच ह्रदयरोगाची समस्या निर्माण होताना दिसते आहे. तरूणांमध्ये देखील मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जीवनशैलीमध्ये काही बदल करून देखील आपण ह्रदयरोग नियंत्रणात ठेऊ शकतो. स्ट्रेस, अल्कोहोल, ब्लड कॉलेस्ट्रॉल, स्थूलपणा यासारख्या गोष्टी देखील ह्रदयरोगाला कारणीभूत आहेत. छातीत दुखणे, हायपर ॲसिडीटी, मळमळणे, घाम येणे, दम लागणे ही अशी हार्ट अटॅकची काही प्रमुख लक्षणे आहेत. तेलकट,मसालेदार, मैद्याचे पदार्थ यामुळे अनेकदा शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. शरीरामध्ये बँड कोलेस्ट्रॉल वाढले तर त्याचे परिणाम रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हार्ट अटॅक येण्याची समस्या निर्माण होते.
संबंधित बातम्या :
वेळीच सावध व्हा…टाइप 2 मधुमेहाचा विळखा वाढतोय…काय सांगतो अभ्यास ?
Health Care : खरबूज हे फळ खूप चवदार आणि आरोग्यासाठीही फायदेशीर, आहारात नक्की समावेश करा!