Health | ताणतणावात असताना या गोष्टींपासून चार हात दूर राहा आणि निरोगी आयुष्य जगा!
मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ताणतणावावर नियंत्रण ठेवणे हे सोपे काम नाही. भूक लागणे आणि अन्नाची लालसा या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ताणतणावात लालसा टाळणे सोपे नाही. पण आरोग्याचा विचार करून तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी चांगले असे काहीतरी करायला हवे.
मुंबई : सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आहे. सतत कामाचे टेन्शन असल्यामुळे ताण-तणाव आयुष्यामध्ये वाढला आहे. जेव्हा तणाव वाढतो तेव्हा आपण अधिक तेलकट आणि गोड पदार्थ खातो. याला इमोशनल इटिंग म्हणतात. कामाच्या दरम्यान चिप्स, बिस्किटे, चॉकलेट जास्त प्रमाणात खाल्ली जातात. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्ही फ्रीकडे जाऊन विविध फास्टफूड (Fast food) खाण्यावर अधिक भर देतात. तणावामुळे खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. यामुळे वजन जास्त होण्यासोबतच शरीरात एकापेक्षा जास्त शारीरिक समस्या (Problem) निर्माण होतात. तुम्हाला स्ट्रेस इटिंगपासून स्वतःला रोखावे लागेल. कारण ताणतणावावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर विविध शारीरिक समस्या निर्माण होतात.
वाचा तणावामध्ये असताना नेमक्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात
- मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ताणतणावावर नियंत्रण ठेवणे हे सोपे काम नाही. भूक लागणे आणि अन्नाची लालसा या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ताणतणावात लालसा टाळणे सोपे नाही. पण आरोग्याचा विचार करून तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी चांगले असे काहीतरी करायला हवे. तणावामध्ये खाण्यावर नियंत्रण कसे ठेवायचे याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
- तणावामध्ये जास्त खाण्यापासून लांब राहा. नाराज होणे, रागावणे हे सामान्य आहे. परंतु यावेळी अस्वास्थ्यकर अन्न खाणे टाळा. काम करताना आपल्या शेजारी हेल्दी गोष्टी ठेवा. म्हणजे जरी आपल्याला ताण आला आणि काहीतरी चांगले खाण्याची इच्छा झाली तर आपण हेल्दी गोष्टींवर ताव मारला पाहिजे. तणाव नियंत्रित करण्यासाठी पुस्तके वाचा किंवा आपल्या जवळच्या आणि खास मानसांसोबत संवाद साधा.
- तणाव कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे योग करणे आहे. केवळ योगासने केल्याने शरीर निरोगी राहते असे नाही. यासोबतच मानसिक आरोग्यही सुधारते. जर तुम्ही कोणत्याही प्रकारे ताणतणावावर नियंत्रण ठेवू शकत नसाल, तर घरी निरोगी अन्न ठेवा. चिप्स, बर्गर, मिठाई यासारखे स्वादिष्ट अस्वास्थ्यकर पदार्थ खरेदी करू नका. त्याऐवजी आरोग्यदायी काही पदार्थ खाण्यावर अधिक भर द्या.
Non Stop LIVE Update