Health | बद्धकोष्ठतेच्या त्रासाचा वैताग आलाय? मग या टिप्स फाॅलो करा आणि बदल बघाच!
ज्यालोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी सर्वात अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. बद्धकोष्ठता असलेल्यांनी शक्यतो बाहेरील अन्न खाणे टाळवे. कारण तसेच तेलकट आणि तुपकट पदार्थ खाऊ नयेत.
मुंबई : दिवसेंदिवस बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास वाढताना दिसतो आहे. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध, कॅन्सरची समस्या देखील निर्माण होऊ शकते. बद्धकोष्ठता होण्याचे कारण म्हणजे जास्त फास्ट फूड खाणे, जास्त मांस खाणे, जास्त तेल आणि मसालेदार खाणे आणि खाण्यामध्ये फायबरचे प्रमाण अत्यंत कमी यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. बद्धकोष्ठतेची समस्या (Problem) असल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. परिणामी शौचास त्रास होतो. दिवसेंदिवस जेव्हा आतड्यांवर दबाव येतो तेव्हा मळमळ, भूक न लागणे, थकवा, अशक्तपणा (Weakness) देखील वाढतो. बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहिल्यास मूळव्याधाची समस्या सुरू होते.
बद्धकोष्ठतेवर उपचार
ज्यालोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी सर्वात अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. बद्धकोष्ठता असलेल्यांनी शक्यतो बाहेरील अन्न खाणे टाळवे. कारण तसेच तेलकट आणि तुपकट पदार्थ खाऊ नयेत. बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी आपल्या आहारामध्ये जास्तीत -जास्त सलाद आणि हिरव्या भाज्याचा समावेश करावा आणि फायबरयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नेहमीच हिरव्या भाज्यांचे सेवन करायला हवे. तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. अशांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी पालकाचा रस प्यायला हवा. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी आहारामध्ये पालकाच्या रसचा समावेश करावा.