Health : रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा आणि पाहा बदल! !

खराब जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांना आरोग्याच्या (Health) अनेक समस्या निर्माण होत आहेत. उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि इतर आजार सातत्याने वाढताना दिसत आहेत. जंक फूडसारखे पदार्थ (Food) खाऊन लोक शरीरातील कोलेस्टेरॉल आणि चरबीचे प्रमाण वाढवत आहेत. खराब कोलेस्टेरॉल आणि फॅटमुळे हृदयविकाराचा धोका कायम असल्याचे सांगण्यात येते.

Health : रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा आणि पाहा बदल! !
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी या टिप्स फाॅलो करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:02 PM

मुंबई : खराब जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांना आरोग्याच्या (Health) अनेक समस्या निर्माण होत आहेत. उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि इतर आजार सातत्याने वाढताना दिसत आहेत. जंक फूडसारखे पदार्थ (Food) खाऊन लोक शरीरातील कोलेस्टेरॉल आणि चरबीचे प्रमाण वाढवत आहेत. खराब कोलेस्टेरॉल आणि फॅटमुळे हृदयविकाराचा धोका कायम असल्याचे सांगण्यात येते. एवढेच नाही तर उच्च रक्तदाब ही देखील एक सामान्य समस्या बनली आहे. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये (Lifestyle) काही बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे.

आहारात बीटचा समावेश करणे फायदेशीर

आपल्या दररोजच्या आहारामध्ये बीटचा समावेश करणे फायदेशीर आहे. बीट मधुमेह नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. तज्ज्ञांच्या मत, त्यात फोलेट असते, ज्यामुळे रक्तवाहिन्या खराब होण्याचा धोका कमी होतो. तसेच यामध्ये असलेले नायट्रिक ऑक्साइड नावाचे रसायन रक्तदाब कमी करण्यास मदत करते.  सलाड, बीटचा रस किंवा बीटचे पराठे तयार करूनही आपण खाऊ शकतो.

लसूणचा देखील फायदेशीर

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी लसूण देखील फायदेशीर आहे. आपण जवळपास सर्वच भाज्यांमध्ये लसणाचा वापर करतो. त्याचबरोबर हा लसूण उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित ठेवतो. लसणात असलेले घटक शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत देते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. लसूण तुम्ही अनेक प्रकारे सेवन करू शकता, पण भाजलेला लसूण जास्त फायदेशीर ठरू शकतो.

फळ आणि हिरव्या भाज्याचे ज्यूस

मधुमेह टाळण्यासाठी हिरव्या भाज्यांचे रस, फळांचे रस घेणे फायदेशीर आहे. तसेच आपण चांगला आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. दालचिनीमुळे शरीरातील इन्सुलिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मधुमेह असलेल्या व्यक्तीने आपल्या आहारात दालचिनीचा समावेश केला पाहिजे. मात्र, दालचिनी किती आहारात घेतली पाहिजे, याबद्दल डाॅक्टरांना विचारणे अधिक फायदेशीर ठरेल.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Healthy diet : निरोगी राहण्याचा एकच फंडा…संतुलित आहार घ्या आणि कॅलरीज मोजत राहा, वाचा अधिक!

Health : उन्हाळ्यात या ज्यूस आणि स्मूदीचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.